पोलीस घडामोडी – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Sat, 08 Aug 2020 13:57:40 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 पोलीस घडामोडी – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 Pune : जुन्या कात्रज घाटातून आरोपींना पलायन करण्यास मदत करणारे 2 पोलिस कर्मचारी सेवेतून बडतर्फ https://policenama.com/pune-2-policeman-2-dismissed-form-service/ Sat, 08 Aug 2020 13:53:39 +0000 https://policenama.com/?p=312807 police bhahi
police bhahi

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  न्यायालयात हजरकरून पुन्हा कारागृहात घेऊन जात असताना त्याना परस्पर पिंपरीला नेले. परंतु, तेथून त्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी हे आदेश काढले आहेत. पोलिस शिपाई विजय आनंदराव मांढरे आणि पोलिस हवालदार सूर्यनारायण थंबराज नायडू अशी या […]

The post Pune : जुन्या कात्रज घाटातून आरोपींना पलायन करण्यास मदत करणारे 2 पोलिस कर्मचारी सेवेतून बडतर्फ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
police bhahi
police bhahi

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  न्यायालयात हजरकरून पुन्हा कारागृहात घेऊन जात असताना त्याना परस्पर पिंपरीला नेले. परंतु, तेथून त्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी हे आदेश काढले आहेत.
पोलिस शिपाई विजय आनंदराव मांढरे आणि पोलिस हवालदार सूर्यनारायण थंबराज नायडू अशी या बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

हे दोघे मुख्यालयात नेमणूकीला असताना संतोष चिंतामणी चांदीलकर, राजू महादेव पात्रे व संतोष मच्छिंद्र जगताप या तिघांनी १० एप्रिल २०१७ रोजी मोरवाडी पिंपरी येथून पलायन केले होते. मात्र, या दोघांनी हवालदार संजय काशिनाथ चंदनशिव यांच्यामार्फत संगनमत करून जुना कात्रज घाट येथे येऊन ते पळून गेल्याची खोटी तक्रार दिली होती. पोलिस पार्टी म्हणून तिघा आरोपींना खंडाळा येथील न्यायालयात हजर करुन पुन्हा कारागृहाच्या स्वाधीन करण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, त्यांनी भोर येथे बिर्याणी हाऊसमध्ये गाडी थांबविली. आरोपींना जेवणाबरोबरच मद्यपान करण्यास मदत केली. जुना कात्रज घाट येथून त्यांना खासगी वाहनाने मोरवाडी पिंपरी येथे जाऊ दिले. तसेच साप्रस पोलिस चौकीजवळ त्यांची वाट पहात थांबले. त्यानंतर ते पळून गेलेले असल्याचे माहिती असताना ते जुना कात्रज घाट येऊन पळून गेल्याची खोटी तक्रार दिली. हे सर्व कृत्य विभागीय चौकशीत निष्पन्न झाले. त्याना माढंरे व नायडु यांना पोलिस सेवेतून बडतर्फ केले आहे.

The post Pune : जुन्या कात्रज घाटातून आरोपींना पलायन करण्यास मदत करणारे 2 पोलिस कर्मचारी सेवेतून बडतर्फ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
312807
‘कोरोना’मुक्त पोलीस देणार ‘कोरोना’ बाधितांना ‘जीवनदान’, प्लाझ्मा दानासाठी पुढाकार https://policenama.com/jai-hind-coronation-free-police-will-give-life-victims-donate-plasma/ Fri, 07 Aug 2020 16:02:43 +0000 https://policenama.com/?p=312515 blood plasma
blood plasma

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पुणे शहरात देखील कोरोना प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. याच दरम्यान रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले. आता कोरोनामुक्त झालेले हे पोलीस कोरोना बाधितांना जीवनदान देणार आहेत. कोरोनामुक्त झालेले राज्य व केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान प्लाझ्मा दान करून इतर बाधित रुग्णांना जीवनदान […]

The post ‘कोरोना’मुक्त पोलीस देणार ‘कोरोना’ बाधितांना ‘जीवनदान’, प्लाझ्मा दानासाठी पुढाकार appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
blood plasma
blood plasma

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पुणे शहरात देखील कोरोना प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. याच दरम्यान रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले. आता कोरोनामुक्त झालेले हे पोलीस कोरोना बाधितांना जीवनदान देणार आहेत. कोरोनामुक्त झालेले राज्य व केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान प्लाझ्मा दान करून इतर बाधित रुग्णांना जीवनदान देणार आहेत.

पोलिसांकडून याची सुरुवात आज (शुक्रवार) पासून ससून रुग्णालयात सुरु झाली आहे. राज्य राखीव दलाच्या सहा जवानांना प्लाझ्मा दान केले आहे. यापुढेही टप्प्याटप्याने आणखी जवान प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. कोरोनामुख्त नागरिकांच्या रक्तामध्ये विषाणुशी लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते. त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा काढून अन्य रुग्णांना दिल्यास त्यांच्यामध्येही वेगाने प्रतिकारशक्ती तयार होते. त्यामुळे देशभरात प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे.
या थेरपीसाठी कोरोनामुक्त झालेल्यांचा प्लाझ्मा आवश्यक असतो. त्यामुळे जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशांनी प्लाझ्मा दान करावा असे आवाहन करण्यात येत आहे. यातूनच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान पुढे आले आहेत. पहिल्या टप्प्यात 16 जवान पात्र ठरले आहेत. त्यातील 6 जणांनी आज प्लाझ्मा दान केले यावेळी राज्य राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक नवीनकुमार रेड्डी, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, रक्तपेढी प्रमुख डॉ. नलिनी काडगी, डॉ. गणेश लांडे, डॉ. शंकर मुगावे आदी उपस्थित होते. डॉ. मुरलीधर तांबे यांच्या हस्ते जवानांना प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी डॉ. तांबे म्हणाले, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवानही प्लाझ्मा दान करणार आहेत. पुढील आठवड्यात त्यांचे प्लाझ्मा दान सुर होईल. एका प्लाझ्मा दानातून दोन कोरोना रुग्णांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पुणे विभागातील सुमारे 200 जवान कोरोना बाधित झाले होते. त्यातील 85 जवानांचे प्लाझ्मा दान करण्यासाठी समुपदेशन केले. त्यापैकी 65 जणांच्या रक्ताचे नमुने प्राथमिक तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले असून जे प्लाझ्मा दान करण्यास पात्र ठरतील त्यांना टप्प्याटप्याने प्लाझ्मा दान करण्यासाठी ससूनमध्ये पाठवले जाईल, असे राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक नवीनकुमार रेड्डी यांनी सांगितले.

The post ‘कोरोना’मुक्त पोलीस देणार ‘कोरोना’ बाधितांना ‘जीवनदान’, प्लाझ्मा दानासाठी पुढाकार appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
312515
लोणीकंद पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेनं ‘त्याचा’ वाचला जीव https://policenama.com/lonikand-police-done-good-job/ Fri, 07 Aug 2020 09:23:01 +0000 https://policenama.com/?p=312361 police bhahi
police bhahi

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन –  बेशुध्द अवस्थेत चार ते पाच तास पडून असलेल्या इसमाला लोणीकंद पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वेळेत औषधोपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला व तो सुखरुप घरी गेला यातून पोलिसातील कौटोबीक जिव्हाळा दिसून आला. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे हे पोलीस ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर असताना रात्री 9 चे सुमारास पेरणे […]

The post लोणीकंद पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेनं ‘त्याचा’ वाचला जीव appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
police bhahi
police bhahi

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन –  बेशुध्द अवस्थेत चार ते पाच तास पडून असलेल्या इसमाला लोणीकंद पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वेळेत औषधोपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला व तो सुखरुप घरी गेला यातून पोलिसातील कौटोबीक जिव्हाळा दिसून आला.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे हे पोलीस ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर असताना रात्री 9 चे सुमारास पेरणे गावातील काही व्यक्ती तेथे आले व गेल्या 4 ते 5 तासांपासून एक अनोळखी इसम पेरणे येथे बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे तरी तुम्ही लवकर चला असे सांगितल्यावर सकाटे यांनी पोलीस उपनिरीक्षक हणमंत पडळकर व पो.कॉ ऋषिकेश व्यवहारे, होमगार्ड वाघमारे यांना याची माहिती दिली. तेथे जाऊन पाहिले असता एक इसम विहिरीजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला.सध्याच्या कोरोना महामारीमुळे वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होणे अवघड असल्याने वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन त्या इसमास तात्काळ जवळच उभा असलेल्या tata 407 टेम्पो मध्ये घालून वाघोली येथील आयमॅक्स हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचे शर्टाचे खिश्यात मोबाईल असल्यामुळे त्याचे पत्नी व मुलगा यांचेशी संपर्क झाल्यामुळे त्यांचे नाव रविंद्र दत्तात्रय कामठे वय 45 वर्षे, रा. पिंपरी सांडस, ता हवेली जि पुणे असल्याचे समजले. डॉक्टरांनी सर्व प्रथमोपचार केल्यानंतर सांगितले की, सदर इसमाचा रक्तदाब व ऑक्सिजन खूप कमी झाला आहे. याला उपचार मिळण्यास आणखी 30 मिनिटे उशीर झाला असता तर सदर इसम जगूच शकला नसता. त्यानंतर एका तासातच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने ते बोलू लागले. त्यांचे नातेवाईकांनी पोलिस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे व पोलिस काॅन्स्टेबल ऋषिकेश व्यवहारे, होमगार्ड परशुराम वाघमारे यांचे आभार मानले.

The post लोणीकंद पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेनं ‘त्याचा’ वाचला जीव appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
312361
पुण्यात ‘बाबूगिरी’ !191 रूग्ण प्रकरणे प्रलंबित ठेवणारे 2 लिपिक पोलिस कर्मचारी निलंबीत https://policenama.com/two-clerks-suspended-keeping-191-cases-pending-pune/ Thu, 06 Aug 2020 14:10:07 +0000 https://policenama.com/?p=312101 coronavirus
coronavirus

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संक्रमणादरम्यान पोलिस रस्त्यावर गस्त घालत असताना कार्यालयातील लिपिक मात्र बेजबाबदारपणे, निष्काळजीपणाने कर्तव्य पार पाडत होते. अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी १९१ पोलिसांची रुग्ण प्रकरणे प्रलंबित ठेवल्यामुळे दोन लिपिकांना निलंबित केले आहे. वरिष्ठश्रेणी लिपिक सतीश मुरलीधर सातपुते आणि कनिष्ठश्रेणी लिपिक आकाश रामचंद्र शिंदे अशी पोलीस दलातील या कर्मचाऱ्यांची नावे […]

The post पुण्यात ‘बाबूगिरी’ !191 रूग्ण प्रकरणे प्रलंबित ठेवणारे 2 लिपिक पोलिस कर्मचारी निलंबीत appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
coronavirus
coronavirus

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संक्रमणादरम्यान पोलिस रस्त्यावर गस्त घालत असताना कार्यालयातील लिपिक मात्र बेजबाबदारपणे, निष्काळजीपणाने कर्तव्य पार पाडत होते. अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी १९१ पोलिसांची रुग्ण प्रकरणे प्रलंबित ठेवल्यामुळे दोन लिपिकांना निलंबित केले आहे. वरिष्ठश्रेणी लिपिक सतीश मुरलीधर सातपुते आणि कनिष्ठश्रेणी लिपिक आकाश रामचंद्र शिंदे अशी पोलीस दलातील या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. त्यासाठी पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी दिवसरात्र रस्त्यावर बंदोबस्ताचे काम करत होते. तसेच आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वांधिक कर्तव्यावर असलेल्या १० हजार २६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १०८ पोलिसांचा मृत्यू झाला, असताना कार्यलयात काम करणारे लिपिक मात्र त्यांना सांगितलेल्या कामात बेजबाबदार, बेफिकीर, सचोटी, कर्तव्यपारायणता, हलगर्जीपणा करत होते. सातपुते यांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक पदाचे ६१ व पोलीस हवालदार पदाचे ५७ असे ११८ रुग्णनिवेदन प्रकरणे प्रलंबित ठेवले आहेत. तर आकाशी शिंदे यांनी त्यांच्याकडे आलेले ७३ रुग्ण निवेदन प्रकरणे प्रलंबित ठेवले.

आपल्याकडे असलेली काम प्रलंबित असताना सुद्धा ते तीन दिवस कोणालाही काही न सांगता गैरहजर राहिले. तसेच २३ जुलैपासून विनापरवाना गैरहजर होते. तेव्हा प्राथमिक चौकशी केली असता त्यात ते कर्तव्यात कसुरी केल्याचे आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.

The post पुण्यात ‘बाबूगिरी’ !191 रूग्ण प्रकरणे प्रलंबित ठेवणारे 2 लिपिक पोलिस कर्मचारी निलंबीत appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
312101
पुण्यातील ‘तो’ पोलिस कर्मचारी खात्यातून बडतर्फ https://policenama.com/pune-policeman-dismissed/ Sun, 26 Jul 2020 11:39:51 +0000 https://policenama.com/?p=307609 coronavirus
coronavirus

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सीबीआयचा (केंद्रीय अन्वेषण विभाग) सीबीआय) अधिकारी असल्याचे सांगत फसविणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. संतोष भगवान साळुंखे असे बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बडतर्फीचे आदेश अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांनी दिले आहेत. बॉम्ब शोधक व नाशक […]

The post पुण्यातील ‘तो’ पोलिस कर्मचारी खात्यातून बडतर्फ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
coronavirus
coronavirus

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सीबीआयचा (केंद्रीय अन्वेषण विभाग) सीबीआय) अधिकारी असल्याचे सांगत फसविणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

संतोष भगवान साळुंखे असे बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बडतर्फीचे आदेश अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांनी दिले आहेत.

बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) येथे साळुंखे २०१३ मध्ये नेमणुकीला होता. त्यावेळी त्याची नेमणूक पोलिस आयुक्त कार्यालयातील गेट क्रमांक तीन येथे करण्यात आली होती. मात्र, तो गुलटेकडी येथील साहेबराव कयानी यांच्या निवासस्थानी गेला. तसेच सीबीआयचा मी अधिकारी असल्याची बतावणी केली. त्या ठिकाणी हवाला रॅकेट चालत असल्याचे सांगत छापा टाकण्याचा बनाव केला. त्यावेळी यातील तक्रारदार यांनी ओळखपत्र व वॉरन्टची विचारणा केली. त्यावेळी त्यानी दुरूनच ओळखपत्र दाखविले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर स्वारगेट पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, साळुंखे याला निलंबित केले होते. या प्रकरणी हडपसर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त यांना विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

हडपसर विभागाच्या सहायक आयुक्तांनी या प्रकरणी सर्व चौकशी केली. तसेच, साळुंखे याला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. पण, या चौकशीत साळुंखे याच्यावर ठेवलेले आरोप सिध्द होत असल्याचे दिसून येत असल्याचा अहवाल दिला होता. साळुंखे याने पदाचा दुरूपयोग करून स्वतः च्या लाभासाठी वापर केला. बेजाबादार पणे वागून गुन्हेगारी कृत्य केल्याचे चौकशीत दिसून आले आहे. त्याच्यामुळे खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. असा ठपका ठेवत साळुंखे याला पोलिस खात्यामधून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

आता साळुंखे याला या आदेशाच्या विरोधात गृह विभागाच्या मुख्य सचिवांकडे 8 दिवसात अपील करण्यास मुदत दिल्याचे आदेशात म्हटले आहे.

The post पुण्यातील ‘तो’ पोलिस कर्मचारी खात्यातून बडतर्फ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
307609
‘त्या’ 2 पोलिसांनी कैद्याला खासगी वाहनानं नेलं घरी, बोकडाचं जेवण पडलं चांगलच महागात, दोघांचे तडकाफडकी निलंबन https://policenama.com/two-policemen-suspended-for-taking-prisoner-home-at-mangalvedha-pandharpur/ Fri, 24 Jul 2020 12:35:23 +0000 https://policenama.com/?p=306964 coronavirus
coronavirus

मंगळवेढा : पोलीसनामा ऑनलाइन –  खुनातील आरोपी असलेल्या कैद्याला दवाखान्यात तपासणीकरिता म्हणून जेलमधून काढल्यानंतर आंबे ( ता. पंढरपूर) येथे बोकडाचा प्लॅन आखला. त्या मोहाने पोलिसांनी त्या कैद्याला खास गाडीने त्याच्या गावी घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी ‘तो’ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आंबे गावासह मंगळवेढा पोलिस दलात खळबळ उडाली होती. त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह कैद्याला जिभेचे चोचले पुरवणाऱ्या […]

The post ‘त्या’ 2 पोलिसांनी कैद्याला खासगी वाहनानं नेलं घरी, बोकडाचं जेवण पडलं चांगलच महागात, दोघांचे तडकाफडकी निलंबन appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
coronavirus
coronavirus

मंगळवेढा : पोलीसनामा ऑनलाइन –  खुनातील आरोपी असलेल्या कैद्याला दवाखान्यात तपासणीकरिता म्हणून जेलमधून काढल्यानंतर आंबे ( ता. पंढरपूर) येथे बोकडाचा प्लॅन आखला. त्या मोहाने पोलिसांनी त्या कैद्याला खास गाडीने त्याच्या गावी घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी ‘तो’ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आंबे गावासह मंगळवेढा पोलिस दलात खळबळ उडाली होती. त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह कैद्याला जिभेचे चोचले पुरवणाऱ्या ‘त्या’ दोन पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

मिळालेल्या माहिती अशी की, मंगळवेढा सबजेलमध्ये असलेल्या आरोपीच्या घरी १३ जुलै रोजी बोकड जेवणाची पार्टी करण्यात आली होती. त्यावेळी त्या कैद्याला आपल्या घरी हजेरी लावण्याकरिता त्या दिवशी ड्युटीवर असलेले गार्ड बजरंग माने आणि उदय ढोणे या दोन पोलिसांनी पोटदुखीचे कारण दाखवून ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा बहाणा केला. नंतर दुपारी १२.३० च्या सुमारास कारागृहातील रजिस्टरला नोंद केल्यानंतर जेलबाहेर पडताच कैद्यास खाजगी वाहनाने थेट त्याच्या आंबे या गावातील घरी बोकड पार्टी करता नेण्यात आले.

बोकड जेवणावर ताव मारुन दोन तासांनी त्यांनी पुन्हा दुपारी २.३० वाजता मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय गाठले. तेथे एक पोटदुखीची गोळी घेऊन परत जेलकडे रवाना झाले. पण दुसऱ्याच दिवशी पार्टीला गेलेला तो कैदी कारागृहातील कैद्यांच्या कोरोना तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आला आणि एकच खळबळ उडाली. त्याच्यासोबत जेवणासाठी हजर असणाऱ्या गावातील लोकांनी स्वतःहून घरीच क्वारंटाईन केल्याने ही चर्चा सर्व तालुक्यात झाली. आणि कैदी पार्टीचे बिंग फुटले.

दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील आणि पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी या प्रकरणाची एका दिवसात चौकशी करुन तात्काळ अहवाल अप्पर पोलिस अधीक्षक यांच्याकडे सादर केला. त्या अहवालाच्या आधारे पहिल्या टप्प्यात निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पुढील टप्प्यात बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.

The post ‘त्या’ 2 पोलिसांनी कैद्याला खासगी वाहनानं नेलं घरी, बोकडाचं जेवण पडलं चांगलच महागात, दोघांचे तडकाफडकी निलंबन appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
306964
काय सांगता ! होय, पोलिसांनी चक्क मुक्या जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न सोडविला https://policenama.com/pune-police-doing-good-work/ Thu, 23 Jul 2020 13:29:39 +0000 https://policenama.com/?p=306498 Police
Police

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी पुणे पोलिस नेहमी चर्चेत तर असतातच पण आता ते अश्याच एका चांगल्या कामामुळे. हडपसर पोलिसांनी मुक्या जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवला आहे. स्वतः कर्मचाऱ्यांनी मंडईमधून पडलेला चारा गोळाकरून पोत्यानी तुकाई टेकडीवरील जनावरांना टाकला आहे. विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या साहाय्याने हे काम केले आहे. पोलीस कर्मचारी तानाजी देशमुख, नितीन चौधरी […]

The post काय सांगता ! होय, पोलिसांनी चक्क मुक्या जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न सोडविला appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Police
Police

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी पुणे पोलिस नेहमी चर्चेत तर असतातच पण आता ते अश्याच एका चांगल्या कामामुळे. हडपसर पोलिसांनी मुक्या जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवला आहे. स्वतः कर्मचाऱ्यांनी मंडईमधून पडलेला चारा गोळाकरून पोत्यानी तुकाई टेकडीवरील जनावरांना टाकला आहे. विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या साहाय्याने हे काम केले आहे.

पोलीस कर्मचारी तानाजी देशमुख, नितीन चौधरी आणि विशेष पोलिस अधिकारी मुलाणी यांनी हे काम केले आहे. त्यांच्या कामगिरीने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

चौधरी व देशमुख हे हडपसर पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. तर मुलाणी हे हडपसर परिसरात एसपीओ म्हणून काम करतात. दरम्यान मुलाणी यांना तुकाई टेकडी परिसरात काही गायी चाऱ्यासाठी वनवन फिरत आहेत. त्यांनी ही माहिती देशमुख यांना सांगितले. त्यांनी जाऊन पाहिले असता काही गायी फिरत असल्याचे दिसून आले. त्यावेळी देशमुख व चौधरी यांनी मंडईत धाव घेतली.

तेथील पडलेला चारा गोळा केला. तो पोत्यानी भरला. तसेच ते पोते तुकाई टेकडीवर आणून टाकले. त्यानंतर काही स्वयंसेवक देखील पोलिसांच्या मदतीला आले. त्यांनी देखील पोलिसांना मदत केली. त्यावेळी देशमुख यांनी मंडईमधील काही व्यापाऱ्यांची आणि या स्वयंसेवक यांची भेट करून देत येथील भाजीपाला गाईंना देण्याचे सांगितले. त्यानुसार आता येथे टाकून देण्यात आलेला भाजीपाला गाईंना मिळू लागला आहे.

The post काय सांगता ! होय, पोलिसांनी चक्क मुक्या जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न सोडविला appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
306498
पुणेकरांचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलातील ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढली https://policenama.com/pune-news-300-police-tested-corona-positive-in-pune-pune-police-force/ Wed, 22 Jul 2020 16:32:09 +0000 https://policenama.com/?p=306134 coronavirus
coronavirus

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. कोरोना काळात पुणे पोलीस दल रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहे. कर्तव्य बजावत असताना कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने पुणे पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण होत आहे. पुणे जिल्ह्याचे रक्षण करणाऱ्यां पोलीस दलात कोरोनाने मोठ्या प्रमाणात […]

The post पुणेकरांचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलातील ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढली appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
coronavirus
coronavirus

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. कोरोना काळात पुणे पोलीस दल रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहे. कर्तव्य बजावत असताना कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने पुणे पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण होत आहे. पुणे जिल्ह्याचे रक्षण करणाऱ्यां पोलीस दलात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस दलात आतापर्यंत 300 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. 300 पैकी 97 जणांवर उपचार सुरु आहेत तर इतर सर्व कोरोनामुक्त झाल्याचे सुत्रांनी सांगितले. पुण्यात आतापर्यंत 3 पोलिसांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे थेट लोकांच्या संपर्कात येणाऱ्या पोलिसांना पीपीई किट देण्यात येणार आहे. पुणे पोलीस दलात तीन हजार पीपीई किट वाटप करण्यात येणार आहे. वैष्णवी महिला उन्नती संस्थेतर्फे पोलिसांनी हे पीपीई किट आणि मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.

पुण्यात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने अनेक भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे हे लॉकडाऊनमध्ये चक्क सायकलवरून पेट्रोलिंग करत आहेत. त्यांच्या अंतर्गत तब्बल 14 कंटेन्मेंट झोन असल्याने पोलिसांनी गल्ली बोळ पत्रे आणि बांबूने सील केले आहेत.यामुळे घेवारे यांनी स्वत:च सायकलवर पेट्रोलिंग सुरु केले आहे. तसेच ते नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहेत.

The post पुणेकरांचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलातील ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढली appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
306134
ट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू https://policenama.com/policeman-died-in-accident/ Wed, 22 Jul 2020 12:25:27 +0000 https://policenama.com/?p=306016 police bhahi
police bhahi

The post ट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
police bhahi
police bhahi

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या गारमाळ परिसरात ट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. सदर घटना 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. हनुमंत विष्णू मुरटे, असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गारमाळ येथे नांदेडवरून वाशिमकडे जाणाऱ्या ट्रकची आणि दुचाकीची (एम. एच. 24 बी एफ 4503) समोरा समोर धकड होऊन पोलीस कर्मचारी मुरटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. खिशात आधार कार्ड सापडल्याने पोलीस कर्मचारी मुरटे यांची ओळख पटली. मुरटे हे कोकळगाव येथील रहिवासी असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांनी दिली.

The post ट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
306016
पुण्यात ‘कोरोना’मुक्त झालेल्या पोलिसांकडून नागरिकांना समुपदेशन अन् मानसिक बळ https://policenama.com/pune-counseling-and-mental-strength-to-the-citizens-by-coronafree-police/ Mon, 20 Jul 2020 16:39:59 +0000 https://policenama.com/?p=305186 Pune police
Pune police

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या भयंकर आजारात पुणेकरांच मन प्रसन्न ठेवण्यासोबत त्यांना खंबीर बनविण्यासाठी आता पुणे पोलिसांनी अभिनव उपक्रम हाती घेतला असून, कोरोनामधून मुक्त झालेले पोलीस पुणेकरांना समुपदेशन करत त्यांना मानसिक बळ देणार आहेत. काही दिवसात हा उपक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आलेले दडपण कमी होण्यास मदत होईल. कोरोनाचा कहर सुरू असून, शहरातील […]

The post पुण्यात ‘कोरोना’मुक्त झालेल्या पोलिसांकडून नागरिकांना समुपदेशन अन् मानसिक बळ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Pune police
Pune police

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या भयंकर आजारात पुणेकरांच मन प्रसन्न ठेवण्यासोबत त्यांना खंबीर बनविण्यासाठी आता पुणे पोलिसांनी अभिनव उपक्रम हाती घेतला असून, कोरोनामधून मुक्त झालेले पोलीस पुणेकरांना समुपदेशन करत त्यांना मानसिक बळ देणार आहेत. काही दिवसात हा उपक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आलेले दडपण कमी होण्यास मदत होईल.

कोरोनाचा कहर सुरू असून, शहरातील प्रत्येक भागात पोलिस चोख कामगिरी बजावत आहेत. नाकाबंदी, पेट्रोलिंग, वाहन तपासणी, वाहतूक नियमन, कोरोना जनजागृतीला प्राधान्य दिले जात आहे. त्याशिवाय परराज्यातील अडकून पडलेल्या नागरिकांना अन्नधान्य, मास्क व सॅनीटायझर वाटप केले जात आहे. कर्तव्य बजावत असताना सव्वा दोनशे पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर दोनशेच्या जवळपास कर्मचारी यातून बरे झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा कर्तव्य बजावण्यास सुरुवात केली आहे. पण या काळात प्रत्येकावर एक मानसिक दडपण आले आहे. मग ते कोरोनाचे असेल किंवा मग व्यावसायिक व नोकरीचे असेल. त्यामुळे अनेकजण खचून गेले आहेत. हीच अडचण ओळखून आता पुणे पोलिसांनी मानसिक आधार देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापार्श्वभूमीवर पुणे पोलीसांमध्ये कोरोनातून मुक्त झालेले कर्मचारी पुढे आले असून, ते आता पुणेकरांना समुपदेशन करणार आहेत. पहिल्या टप्प्यातील ५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे कर्मचारी नागरिकांचे समुपदेशन करतील. कोरोना बाधितांचे मानसिक आत्मबल उंचावण्याचा प्रयत्न करणार आहेत.

असे असेल काम…
कोरोनामुक्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने पोलिस नियंत्रण कक्षातून नागरिकांना फोन करुन कोरोनाबाबात जनजागृती केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांनी अनुभवलेला कोरोना, याबाबतही नागरिकांना माहिती दिली जाईल. तर त्यांना काय खबरदारी घ्यावी याचे आवाहन केले जाणार आहे. पुणेकर नागरिकांना आधार देउन त्यांचे मनोबल उंचावण्यात येईल.

कोरोनामुक्त झालेल्या कर्मचारी नागरिकांना समुपदेशन करतील. पहिल्या टप्प्यात ५० कर्मचाऱ्यांकडून समुपदेशनाची जबाबदारी पार पाडली जाणार आहे. सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, विनाकारण प्रवास, सॅनिटायझरचा वापर, सुरक्षितता बाळगण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. कोरोनाची जनजागृती करण्यास पोलिसांकडून भर दिला जात आहे.
डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त,

The post पुण्यात ‘कोरोना’मुक्त झालेल्या पोलिसांकडून नागरिकांना समुपदेशन अन् मानसिक बळ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
305186