राजकीय – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Wed, 29 Jan 2020 09:11:02 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 राजकीय – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 निर्भया केस ! न्याय मिळण्यास उशीर होत असल्यानं जनतेकडून ‘एन्काऊंटर’ झाल्यास आनंद व्यक्त, ‘या’ माजी मुख्यमंत्र्यानं सांगितलं https://policenama.com/former-cm-of-mp-shivraj-singh-chouhan-on-nirbhaya-case-justice-delayed-is-justice-denied-nodrj/ Wed, 29 Jan 2020 09:11:02 +0000 https://policenama.com/?p=221278

The post निर्भया केस ! न्याय मिळण्यास उशीर होत असल्यानं जनतेकडून ‘एन्काऊंटर’ झाल्यास आनंद व्यक्त, ‘या’ माजी मुख्यमंत्र्यानं सांगितलं appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भयांच्या दोषींना फाशी देण्यास उशीर होत आहे. यावर आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात निर्भया प्रकरणातील दोषी मुकेशवर सुनावणीदरम्यान शिवराज सिंह चौहन यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत अशा गुन्हेगारांसाठी कायद्यात बदल करण्यात यावे अशी मागणी केली. तसेच निर्भया प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी करत सांगितले की, असे कायदेशीर डाव पेच सुरु असतात त्यामुळे लोक हैदराबाद एन्काऊंटर खुश आहेत.

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर –
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये चार आरोपींनी एका वेटनरी डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता आणि तिला जीवंत जाळण्यात आले होते. हैदराबादच्या प्रकरणानंतर देशात संपाताचे वातावरण होते. लोक रस्त्यावर उतरले. त्यानंतर पोलिस आणि आरोपींमध्ये झालेल्या कथित चकमकीत आरोपांचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. हा एन्काऊंटर तेव्हा झाला जेव्हा आरोपींना घटनास्थळी तपासासाठी नेण्यात आले होते.

या ठिकाणी आरोपींनी पोलिसांवर हल्ला केल्याचा कथित प्रकार घडला होता, या चकमकी दरम्यान आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला. एकीकडे देशभरातील हैदराबादमधील दिक्षाला न्याय दिल्याबद्दल जनमानसातून पोलिसांचे कौतूक होत होते तर दुसरीकडे मानवधिकार आयोग आणि न्यायालयाने पोलिसांच्या या कृत्यावर प्रश्न उपस्थित केला होते.

फेसबुक पेज लाईक करा

The post निर्भया केस ! न्याय मिळण्यास उशीर होत असल्यानं जनतेकडून ‘एन्काऊंटर’ झाल्यास आनंद व्यक्त, ‘या’ माजी मुख्यमंत्र्यानं सांगितलं appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
221278
‘झाकली मूठ’ कायम राहावी असाच केंद्र सरकारचा ‘हेतू’ ? शिवसेनेचा भाजपवर ‘घणाघात’ https://policenama.com/does-central-government-intend-keep-cover-shiv-senas-question-bjp/ Wed, 29 Jan 2020 06:19:13 +0000 https://policenama.com/?p=221198

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने ज्या तडकाफडकी कोरेगाव भीमा दंगलीचा तपास ‘एनआयए’कडे म्हणजे स्वतःच्या अखत्यारीत घेतला त्यावरून या सर्व गोष्टींची ‘झाकली मूठ’ कायम राहावी असाच केंद्र सरकारचा हेतू आहे का? असा सवाल सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाला केला आहे. प्रत्येक राज्याला स्वतःचे अधिकार व स्वाभिमान आहे. केंद्राची मनमानी त्यामुळे अस्थिरतेस आमंत्रण देते. ‘एनआयए’ने महाराष्ट्रात […]

The post ‘झाकली मूठ’ कायम राहावी असाच केंद्र सरकारचा ‘हेतू’ ? शिवसेनेचा भाजपवर ‘घणाघात’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने ज्या तडकाफडकी कोरेगाव भीमा दंगलीचा तपास ‘एनआयए’कडे म्हणजे स्वतःच्या अखत्यारीत घेतला त्यावरून या सर्व गोष्टींची ‘झाकली मूठ’ कायम राहावी असाच केंद्र सरकारचा हेतू आहे का? असा सवाल सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाला केला आहे. प्रत्येक राज्याला स्वतःचे अधिकार व स्वाभिमान आहे. केंद्राची मनमानी त्यामुळे अस्थिरतेस आमंत्रण देते. ‘एनआयए’ने महाराष्ट्रात झडप घातली. अशी अनेक प्रकरणे भाजपशासित राज्यांत घडत आहेत. तेथे केंद्राचा हस्तक्षेप का नाही ? अशा शब्दात सामनामधून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी केंद्रातून रात्री अपरात्री प्रयत्न केले गेले. त्याचप्रमाणे एल्गार प्रकरणी गृह मंत्रालयाने रात्रीच एनआयएला महाराष्ट्रात पाठवले हे लक्षण बर नाही. रात्रीच्या अंधारात पाय ठेसाळू नये म्हणून महाराष्ट्र सरकारने मुंबई रात्री देखील सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काळोखात पाप करू नका असा इशारा सामनामधून केंद्रातील भाजप सरकारला देण्यात आला आहे.

काय म्हंटलय नेमकं सामनाच्या अग्रलेखात
केंद्रीय गृहमंत्रालयाने भीमा-कोरेगाव दंगल प्रकरण म्हणजेच ‘एल्गार’ परिषद गुन्हय़ाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे म्हणजे ‘एनआयए’कडे देण्याचा निर्णय घेतला आहे व त्यादृष्टीने या तपासावर एका रात्रीत ‘झडप’ घालण्याचा प्रयत्न धक्कादायक नाही, तर संशयास्पद आहे.

लोकशाहीवर कितीही खुनी हल्ले झाले तरी त्याच लोकशाही मार्गाने राज्याराज्यांतून त्यांची सरकारे लोकांनी उलथवून टाकली आहेत. केंद्रात मोदी-शहांचे राज्य नक्कीच आहे, पण महाराष्ट्रासह प्रमुख राज्ये त्यांच्या हातात राहिलेली नाहीत. त्याची वेदना आम्ही समजू शकतो, पण म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा हस्तक्षेप घडवून राज्यांवर दबाव टाकण्याचे तंत्र योग्य नाही.

भीमा-कोरेगाव दंगल हे एक राजकीय आणि राष्ट्रीय षड्यंत्र होतेच. त्यामागे देशविघातक शक्ती असू शकतात. या शक्ती देशाची सत्ता उलथवून टाकण्याचा कट गुप्तपणे रचत असल्याचे सांगण्यात येते. याच गुप्त शक्तीमुळे पंतप्रधान मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या जीवितास धोका निर्माण झाला. याला पुरावा काय? तर अशा प्रकारची निनावी पत्रे, ई-मेल्स वगैरे सापडली आहेत.

या सर्व प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे ठरवले, पण आतापर्यंत खोदकाम किती खोल झाले व देशाची सत्ता उलथवून टाकण्याचा कट म्हणजे काय होता ते लोकांना धडपणे समजले नाही. आपल्याविरोधात कटकारस्थाने होत आहेत. आपल्या सत्तेस सुरुंग लावला जाईल या भीतीची टांगती तलवार सगळय़ाच सत्ताधाऱ्यांच्या डोक्यावर असते व त्यातून उलटसुलट कारवाया सुरू असतात.

भीमा-कोरेगाव प्रकरणात तसेच झाले असावे. या प्रकरणात विचारवंत, बुद्धिवादी समजणारे काही ‘डाव्या’ विचारसरणीचे लोक पकडले गेले आहेत. ही सर्व मंडळी लेखक, कवी, वक्ते आहेत. ते कम्युनिस्ट विचारसरणीचे आहेत व त्यांच्याच प्रेरणेने भीमा-कोरेगाव प्रकरण घडले व त्यामागे पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेचा हात आहे असे नंतर जाहीर झाले. मात्र एल्गार परिषद आणि नंतर उसळलेली दंगल, हिंसाचार हे दोन्ही मुद्दे वेगवेगळे आहेत.

भुकेल्या लांडग्याने भक्ष्यावर झडप घालावी तशी राज्याच्या अधिकारावर झडप घालण्याची गरज नव्हती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून मार्ग काढता आला असता, पण प्रकाश आंबेडकरांनी वर्णन केले त्याप्रमाणे केंद्र सरकारची अवस्था अति दारू पिणाऱया बेवडय़ाप्रमाणे झाल्याने त्यांच्या झोकांडय़ा जात आहेत व शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे, केंद्र सरकारला याप्रकरणी सत्य लपवायचे आहे व कुणाला तरी वाचवायचे असल्यानेच ‘एल्गार’चा तपास जबरदस्तीने ‘एनआयए’कडे घेतला आहे. ही मनमानी आहे.

आंदोलन करणाऱयांना, सत्य बोलणाऱयांना गोळय़ा घाला, देशाबाहेर फेकून द्या, अशी उन्मत्त भाषा मंत्रीपदावरील व्यक्ती करीत आहेत. अर्थात हा त्यांचा राष्ट्रभक्तीचा ‘एल्गार’ ठरतो व त्यामागे एखादे षड्यंत्र आहे का याचा तपास व्हावा असे कुणास वाटत नाही.

या संपूर्ण प्रकरणात आधीच्या फडणवीस सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचे जे आरोप यापूर्वी झाले होते त्यांना प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपांनी पुष्टीच मिळाली आहे. शनिवारवाडय़ासमोरच्या एल्गार परिषदेत काही बाहेरच्या लोकांनी भडकावू भाषणे केली. ही भाषणे करणारे लोक भाजपच्या भाषेत ‘तुकडे तुकडे गँग’चे सदस्य होते हे मान्य केले तरी या तुकडे तुकडे गँगपेक्षा भयंकर विखारी भाषणे सध्या भाजपचे नेते, मंत्री करू लागले आहेत.

देशातील अनेक राज्यांत भारतीय जनता पक्षाची सरकारे नाहीत. संपूर्ण देश त्यांना भाजपमय करायचा होता. सुरुवात चांगली झाली होती, पण आता चित्र आणि हिंदुस्थानी नकाशाचा रंग बदलून गेला आहे.

फेसबुक पेज लाईक करा

The post ‘झाकली मूठ’ कायम राहावी असाच केंद्र सरकारचा ‘हेतू’ ? शिवसेनेचा भाजपवर ‘घणाघात’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
221198
‘खोटारडेपणा’ जमिनीवर ‘अवतरला’ तर तो देखील PM मोंदींसमोर हात जोडेल, म्हणेल – ‘तुम्ही आमचे सिनिअर आहात’ https://policenama.com/congress-yuva-aakrosh-rally-rahul-gandhi-narendra-modi-lie/ Wed, 29 Jan 2020 03:06:02 +0000 https://policenama.com/?p=221148

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील जयपूरमध्ये मंगळवारी काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी युवा आक्रोश रॅलीला संबोधित केले. राहुल गांधी यांच्या आधी अनेक कॉंग्रेस नेत्यांनी देखील भाषण केले. यावेळी एका काँग्रेस युवा नेत्याने थेट पंतप्रधान मोदींवरच हल्ला बोल केला. तो म्हणाला, पंतप्रधान इतके खोटे बोलतात की खोटेपणा त्यांचा चेहरा पाहून दुसरीकडे निघून जात असेल. रॅलीचे संचालन […]

The post ‘खोटारडेपणा’ जमिनीवर ‘अवतरला’ तर तो देखील PM मोंदींसमोर हात जोडेल, म्हणेल – ‘तुम्ही आमचे सिनिअर आहात’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील जयपूरमध्ये मंगळवारी काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी युवा आक्रोश रॅलीला संबोधित केले. राहुल गांधी यांच्या आधी अनेक कॉंग्रेस नेत्यांनी देखील भाषण केले. यावेळी एका काँग्रेस युवा नेत्याने थेट पंतप्रधान मोदींवरच हल्ला बोल केला. तो म्हणाला, पंतप्रधान इतके खोटे बोलतात की खोटेपणा त्यांचा चेहरा पाहून दुसरीकडे निघून जात असेल.

रॅलीचे संचालन करणाऱ्या एका युवा काँग्रेस नेत्याने व्यासपीठावर म्हंटले की, खोटेपणावरून आठवले, आपले पंतप्रधान इतके खोटे बोलतात की उद्या जर चुकून खोटेपणा धर्तीवर अवतरला आणि मोदींसमोर चुकून गेला तर मी शपथ घेऊन सांगतो खोटेपणा मोदींना हात जोडेल आणि म्हणेल तुम्ही आधी जा कारण तुम्ही आम्हाला सिनिअर आहात.

काँग्रेस पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. काही दिवसांपूर्वी कपिल सिब्बल यांनी देखील पंतप्रधान आणि गृह मंत्री यांची नऊ खोटी विधाने सांगितली होती.

जयपूरच्या रॅलीमध्ये राहुल गांधींनी केला हल्लाबोल
राहुल गांधी यांनी बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेवरून सरकारवर चांगलाच हल्ला बोल केला. एवढेच नाही तर पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा खराब केल्याचेही राहुल गांधी यांनी म्हंटले.

सीएए बाबतच्या हिंसाचारावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, सध्या सरकार स्वतः हिंसा घडवून आणत आहे आणि एका धर्माला दुसऱ्या धर्मविरोधात लढवत आहे. तसेच यावेळी बोलताना केंद्र सरकारच्या जीएसटी,नोटबंदी आणि घसरणार जीडीपी अशा अनेक धोरणांवर हल्लाबोल करण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा

The post ‘खोटारडेपणा’ जमिनीवर ‘अवतरला’ तर तो देखील PM मोंदींसमोर हात जोडेल, म्हणेल – ‘तुम्ही आमचे सिनिअर आहात’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
221148
‘या’ नेत्यामुळे प्रशांत किशोर जेडीयूमध्ये, नितीश कुमार यांचा ‘मोठा’ खुलासा https://policenama.com/bihar-cm-and-jdu-leader-nitish-kumar-on-prashant-kishor-and-reveled-reference-of-amit-shah/ Tue, 28 Jan 2020 17:20:05 +0000 https://policenama.com/?p=221119

The post ‘या’ नेत्यामुळे प्रशांत किशोर जेडीयूमध्ये, नितीश कुमार यांचा ‘मोठा’ खुलासा appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

पाटणा : वृत्तसंस्था – सीएए आणि एनआरसी नोंदणीवर जनता दलाचे नेते आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशावर बिहारचे मुख्यमंत्री आणि जलता दलाचे (यु) अध्यक्ष नितीश कुमार यांनी मोठा खुलासा केला आहे. प्रशांत किशोर यांना जनता दल (यु) मध्ये प्रवेश देण्याचा निर्णय तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा याच्या सांगण्यावरून घेतला असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.

प्रशांत किशोर यांनी काही वर्षे राजकीय रणनितीकार म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल (यु) या पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने अनेकांच्या भुवया उचावल्या होत्या. प्रशांत किशोर हे मागील काही दिवसांपासून भाजप विरोधात उघडपणे भूमिका घेत आहेत. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूच्या युतीची सत्ता आहे.

एका प्रश्नाला उत्तर देताना नितीश कुमार यांनी सांगितले की, पक्षात राहण्याची ज्यांची इच्छा असेल तो पक्षात राहिल. ज्यांची इच्छा नसेल ते पक्ष सोडून जातील. आम्ही सामान्य माणसं असून आमचा पक्ष मोठ्या माणसांचा पक्ष नाही. मात्र, आम्ही सर्वांचा सन्मान करत असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले. प्रशांत किशोर हे पक्षात कायम राहिले तरी आम्हाला काही त्रास नाही आणि सोडून गेले तरी काही विशेष त्रास होणार नसल्याचे सूचक विधान नितीश कुमार यांनी केले. यावरून नितीश कुमार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये सध्या अलबेल नसल्याचे स्पष्ट होते.

The post ‘या’ नेत्यामुळे प्रशांत किशोर जेडीयूमध्ये, नितीश कुमार यांचा ‘मोठा’ खुलासा appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
221119
CAA आणि NRC ला समर्थन नाही, घुसखोरांविरुद्ध मोर्चा : राज ठकरे https://policenama.com/no-support-to-nrc-and-caa-new-says-mns-president-raj-thackeray/ Tue, 28 Jan 2020 16:17:47 +0000 https://policenama.com/?p=221067

The post CAA आणि NRC ला समर्थन नाही, घुसखोरांविरुद्ध मोर्चा : राज ठकरे appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाअधिवेशनामध्ये पाकिस्तानी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कडक भूमिका जाहीर केली आहे. त्यानंतर राज यांनी सीएए आणि एनआरसीला पाठिंबा आहे असे बोलले जात होते. घुसखोरांविरुद्ध मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्याची आज (मंगळवार) कृष्णकुंजवर बैठक घेतली.

कृष्णकुंजवर झालेल्या बैठकीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज यांना नव्या भूमिकेवरून प्रश्न उपस्थित होत असल्याचे सांगितले. त्यावर राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व शंकांचे निरासन करताना मोर्चा हा सीएए आणि एनआरसीच्या समर्थनासाठी नाही. त्यावर चर्चा होऊ शकते मात्र समर्थन होऊ शकत नाही असेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. मोर्चा हा घुसघोरांविरोधात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नव्या भूमिकेमुळे राज ठाकरे हे भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे आपण भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ जात नाही हेच राज ठाकरे यांनी या बैठकितून स्पष्ट केल्याचे बोलले जातंय. दरम्यान, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी रंगशारदा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. शॅडो कॅबिनेट आणि 9 फेब्रुवारीच्या आयोजित मोर्चासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली होती.

The post CAA आणि NRC ला समर्थन नाही, घुसखोरांविरुद्ध मोर्चा : राज ठकरे appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
221067
अजित पवार मुख्यमंत्र्याप्रमाणे वागतायत : चंद्रकांत पाटील https://policenama.com/ajit-pawar-is-behaving-like-a-cm-says-chandrkant-patil-in-kolhapur/ Tue, 28 Jan 2020 16:10:39 +0000 https://policenama.com/?p=221059 Chandrakant Patil ajit pawar
Chandrakant Patil ajit pawar

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत मात्र तेच मुख्यमंत्री असल्यासारखं वागत आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकमेकांचं एकमेकांवर वजन आहे अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कोल्हापूरमध्ये भाजपने महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफी विरोधात मोर्चा काढला होता. मोर्चानंतर ते प्रसारमध्यमांशी बोलत होते. कोरेगाव भीमा विषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, माजी […]

The post अजित पवार मुख्यमंत्र्याप्रमाणे वागतायत : चंद्रकांत पाटील appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Chandrakant Patil ajit pawar
Chandrakant Patil ajit pawar

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत मात्र तेच मुख्यमंत्री असल्यासारखं वागत आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकमेकांचं एकमेकांवर वजन आहे अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कोल्हापूरमध्ये भाजपने महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफी विरोधात मोर्चा काढला होता. मोर्चानंतर ते प्रसारमध्यमांशी बोलत होते.

कोरेगाव भीमा विषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करायला कुणी अडवलं आहे ? आम्ही स्वच्छ आहोत. जी काही चौकशी करायची ती लवकरात लवकर करा. सरकारमध्ये एकमेकांचं एकमेकांवर वजन आहे त्यामुळे तेच पडतील असा टोला त्यांनी लगावला. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत मात्र तेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. ते स्वत:च वेगवेगळ्या घोषणा करत असल्याची टीका त्यांनी केली. भीमा कोरेगाव प्रकरणात केंद्राच्या समितीला सहकार्य केले नाही तर त्याचे कायदेशीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिला.

महाविकास आघाडीच्या सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी विरोधात भाजपने आज कोल्हापूरमध्ये मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व भाजप ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष सरमजितसिंह घाटगे यांनी केले. यावेळी सरसकट कर्जमाफीसह मायक्रो फायनान्सच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देण्यात आले.

The post अजित पवार मुख्यमंत्र्याप्रमाणे वागतायत : चंद्रकांत पाटील appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
221059
‘या’ 3 नेत्यांचे आशिर्वाद असेपर्यंत सरकारला धक्का नाही : अजित पवार https://policenama.com/maharashtra-dy-cm-ajit-pawars-reaction-on-ashok-chavan-comment/ Tue, 28 Jan 2020 15:38:04 +0000 https://policenama.com/?p=221046 Ajit Pawar
Ajit Pawar

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेड येथे बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेबाबत गौप्यस्फोट केला. यावरून वाद सुरु असून विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर सावध उत्तर दिले आहे. सरकारमधल्या सगळ्या तिनिही पक्षांच्या विचारधारा या वेगवेगळ्या आहेत. या सरकारवर शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव […]

The post ‘या’ 3 नेत्यांचे आशिर्वाद असेपर्यंत सरकारला धक्का नाही : अजित पवार appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Ajit Pawar
Ajit Pawar

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेड येथे बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेबाबत गौप्यस्फोट केला. यावरून वाद सुरु असून विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर सावध उत्तर दिले आहे. सरकारमधल्या सगळ्या तिनिही पक्षांच्या विचारधारा या वेगवेगळ्या आहेत. या सरकारवर शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत. या तीन नेत्यांचे आशीर्वाद आहेत तोपर्यंत काहीही होणार नसल्याचे अजित पवार म्हणाले.

लवकर जाऊद्या तोंडातून एखादा शब्द जाईल अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, अजून माझे आणि अशोक चव्हाण यांचे बोलणं झालेलं नाही. त्यामुळे ते नेमके काय बोलले ते मला समजू द्या. कारण एखाद्या गोष्टीची अर्थ ‘ध’ चा ‘म’ असा काढला जातो. त्यामुळे बोलताना खूप तोलून मापून बोलावे लागते. त्यामुळे लवकर जाऊ द्या नाहीतर माझ्या तोंडातून एखादा शब्द बाहेर जाईल, असे सांगत त्यांनी या वादावर बोलणे टाळले.

उद्धव ठाकरे, शरद पवार नाराज
अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत वाद सुरु झाले आहेत. सरकारमध्ये येताना शिवसेनेकडून घटनेप्रमाणे काम करणार असं लिहून घेतल्याचे वक्तव्या अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याची सांगण्यात येत आहे.

अशी वक्तव्ये टाळावीत – मुख्यमंत्री
चव्हाणांच्या या वक्तव्यामुळे अकारण गैरसमज पसरले आहेत. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मत आहे. त्यामुळे अशी वक्तव्ये टाळावीत अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे बोललं जातंय. तसेच अशोक चव्हाण यांनी असे वक्तव्य का केले हे माहित नसल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल सांगितले.

The post ‘या’ 3 नेत्यांचे आशिर्वाद असेपर्यंत सरकारला धक्का नाही : अजित पवार appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
221046
राज्याच्या विकासाची गाडी ‘मेट्रो’ प्रमाणे धावणार, CM ठाकरेंचा ‘विश्वास’ https://policenama.com/state-development-will-run-metro-uddhav-thackeray/ Tue, 28 Jan 2020 15:37:27 +0000 https://policenama.com/?p=221049

The post राज्याच्या विकासाची गाडी ‘मेट्रो’ प्रमाणे धावणार, CM ठाकरेंचा ‘विश्वास’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत लोकमान्य नगर ते सीताबर्डी इंटरचेंजपर्यंतच्या 11 किमीच्या अ‍ॅक्वा लाइनचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, जग वेगाने पुढे जात आहे. विकासाचा वेग वाढला आहे. विकासात राजकारण न करता राज्यात विकासाची कामे त्याच वेगाने करायची आहेत. विकास करताना कामाचे श्रेय घ्यायचे नाही. हे सरकार माझे नाही तर आपले आहे.राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोच्या वेगाने धावणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ऊर्जा व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, नागरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, खासदार कृपाल तुमाने, विकास महात्मे, आमदार विकास ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित उपस्थित होते.

विकासाच्या एकाच स्टेशनवर एकत्र
यावेळी उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले. एका गाडीत बसू शकलो नाही मात्र एकाच स्टेशनवर आलो, असा चिमटा त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काढला. मुंबई, नागपूर बरोबरच राज्यातल्या इतर शहरांचा विकास करण्याचे आश्वासन दिले. तसेच विकासाच्या बाबतीत नागपूर शहर इतर शहरांच्या मागे पडू देणार नाही. विकास कामांमध्ये खंड पडू देणार नाही. ब्रॉडगेज प्रस्तावालाही तातडीने परवानगी देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

The post राज्याच्या विकासाची गाडी ‘मेट्रो’ प्रमाणे धावणार, CM ठाकरेंचा ‘विश्वास’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
221049
‘I LOVE केजरीवाल’ स्टीकर लावल्यामुळे 10000 चा फाईन का लावला ? उच्च न्यायालयानं मागितलं ‘उत्तर’ https://policenama.com/i-love-kejriwal-sticker-auto-challan-delhi-high-court-notice-traffic-police/ Tue, 28 Jan 2020 14:53:00 +0000 https://policenama.com/?p=221035 i love kejriwal
i love kejriwal

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिक्षावर ‘आय लव केजरीवाल’ स्टीकर लावण्याच्या प्रकरणी दिल्लीच्या उच्च न्यायालयाने आज मंगळवारी दिल्ली सरकार, दिल्ली पोलीस आणि निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली आहे. एका ऑटो चालकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे की, ‘आय लव्ह केजरीवाल’ स्टीकर लावल्याने वाहतूक पोलिसांनी त्याला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. आता वाहतूक पोलिसांना सांगावे […]

The post ‘I LOVE केजरीवाल’ स्टीकर लावल्यामुळे 10000 चा फाईन का लावला ? उच्च न्यायालयानं मागितलं ‘उत्तर’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
i love kejriwal
i love kejriwal

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिक्षावर ‘आय लव केजरीवाल’ स्टीकर लावण्याच्या प्रकरणी दिल्लीच्या उच्च न्यायालयाने आज मंगळवारी दिल्ली सरकार, दिल्ली पोलीस आणि निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली आहे. एका ऑटो चालकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे की, ‘आय लव्ह केजरीवाल’ स्टीकर लावल्याने वाहतूक पोलिसांनी त्याला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. आता वाहतूक पोलिसांना सांगावे लागेल की कोणत्या नियमांतर्गत चलन कापण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी 3 मार्चला होईल.

या प्रकरणी 3 मार्चला न्यायालयात सुनावणी होईल आणि वाहतूक पोलिसांना सांगावे लागेल की कोणत्या वाहतूक नियमांतर्गत ‘आय लव्ह केजरीवाल’ स्टीकर लावण्याने रिक्षा चालकाकडून चलन कापण्यात आले.

या दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणूकीत नागरिकत्व सुधारणा कायदा आणि शाहीन बाग होत असलेल्या वक्तव्यवरुन भाजपच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आम आदमी पार्टी मंगळवारपासून नवी मोहिम सुरु करत आहे.

फेसबुक पेज लाईक करा

The post ‘I LOVE केजरीवाल’ स्टीकर लावल्यामुळे 10000 चा फाईन का लावला ? उच्च न्यायालयानं मागितलं ‘उत्तर’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
221035
पाकिस्तानचे ‘हिरो’ राहिलेले आहेत अदनान सामीचे वडिल, 1965 च्या युध्दात भारतावर केला होता बॉम्बचा ‘वर्षाव’ https://policenama.com/adnan-sami-father-fought-in-1965-war-from-pakistan-against-india/ Tue, 28 Jan 2020 14:09:31 +0000 https://policenama.com/?p=221015 adnan sami
adnan sami

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकारने गायक अदनान सामीला पद्मश्री देऊन सन्मानित केले. यानंतर वाद उफाळून आला. ज्या व्यक्तीचे वडील भारताच्या विरोधात युद्धात लढले, त्याच्या मुलाचा सन्मान कसा केला जाऊ शकतो. अदनान सामीचे वडील अरशद सामी खान पाकिस्तानी एअरफोर्सकडून 1965 च्या युद्धात भारताच्या विरोधात लढले होते. अदनान सामीचे वडील अरशद सामी खान 8 फेब्रुवारी […]

The post पाकिस्तानचे ‘हिरो’ राहिलेले आहेत अदनान सामीचे वडिल, 1965 च्या युध्दात भारतावर केला होता बॉम्बचा ‘वर्षाव’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
adnan sami
adnan sami

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकारने गायक अदनान सामीला पद्मश्री देऊन सन्मानित केले. यानंतर वाद उफाळून आला. ज्या व्यक्तीचे वडील भारताच्या विरोधात युद्धात लढले, त्याच्या मुलाचा सन्मान कसा केला जाऊ शकतो. अदनान सामीचे वडील अरशद सामी खान पाकिस्तानी एअरफोर्सकडून 1965 च्या युद्धात भारताच्या विरोधात लढले होते.

अदनान सामीचे वडील अरशद सामी खान 8 फेब्रुवारी 1942 ला अफगाणिस्तामध्ये जन्मले होते. अदनानचे आजोबा अरशद यांचे वडील अब्दुल सामी खान डिप्टी जनरल ऑफ पोलीस होते. तेव्हा भारत आणि पाकिस्तानचे विभाजन झालेले नव्हते.

अफगाणिस्तानात साक्का हबीबुल्ला ककानी क्रांतिच्या वेळी अरशद सामी खानचे आजोबा मेहफूज जनला मारले होते. यानंतर अरशद सामी खान यांचे कुटूंब अफगाणिस्तानातून पळून पाकिस्तानच्या पेशावरला येऊन राहण्यास लागले. कुटूंबांतील परंपरा पाहून अदनानचे वडील अरशद सामी खान यांनी देखील पाकिस्ताची वायुसेनामध्ये सहभागी झाले. अरशद सामी तेव्हा नॅशनल हिरो झाले जेव्हा त्यांना पाकिस्तान सरकारने सितारा-ए-जुर्रत पुरस्कार देण्यात आला. हा पाकिस्तानी सैन्यातील तिसरा सर्वात मोठा शौर्य पुरस्कार मानला जातो.

अरशद सामी खान पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान, याह्या खान आणि जुल्फिकार अली भूट्टोचे एडीसी देखील होते. अरशद अनेक देशात पाकिस्तानचे राजदूत म्हणून कार्यरत होते. 1989 मध्ये त्यांना पॅंक्रियाटिक कॅंसरची माहिती मिळाली. त्यांच्यावर लंडनच्या क्रोमवेल रुग्णालयात उपचार सुरु होते. यानंतर 20 वर्षांनी त्यांचे निधन मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात 22 जून 2009 साली झाले.

1965 साली झालेल्या भारत पाक युद्धात अरशद सामी खान पाकिस्तानी एअरफोर्समध्ये फ्लाइट लेफ्टिनेंट होते. पाकिस्तानी एअरफोर्स म्यूझिअमच्या वेबसाइटवर दिलेल्या माहिती नुसार अरशद सामी खान यांनी या युद्धात 1 लढाऊ विमान, 15 टॅंक आणि 22 सैन्याच्या गाड्या उध्वस्त केल्या होत्या. या शौर्यासाठी पाकिस्तानी सरकारने त्यांना सितारा-ए-जुर्रत पुरस्काराने गौरवले होते.

फेसबुक पेज लाईक करा

The post पाकिस्तानचे ‘हिरो’ राहिलेले आहेत अदनान सामीचे वडिल, 1965 च्या युध्दात भारतावर केला होता बॉम्बचा ‘वर्षाव’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
221015