‘या’ 5 नैसर्गिक उपायांनी टाळू शकता हार्ट ब्लॉकेज, जाणून घ्या लक्षणे आणि कारणे

हृदयाचे आरोग्य आपल्या शरीरासाठी खुप महत्वाचे आहे. कारण शरीरातील हा सर्वात महत्वाचा अवयव आहे. अनेक कारणामुहे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. अशाच काही कारणांमुळे हार्ट ब्लॉकेज झाल्यास हृदयाची इलेक्ट्रिक सिस्टम प्रभावित होते. ही समस्या कोरोनरी आर्टी डिसीजपेक्षा वेगळी असून यात हृदयाच्या रक्त वाहिन्यांवर प्रभाव पडतो. हार्ट ब्लॉकेज झाल्याने हृदयाचे ठोके अनियमित होतात. हळू गतीने हृदय काम करते. हृदयाचे ठोके एकावेळी 20 सेकंद उशीराने होतात.

ही आहेत लक्षणे
1 छातीत वेदना, अस्वस्थ वाटणे
2 रक्त पुरवठा व्यवस्थित नसल्याने एक्सरसाइजमध्ये अडचण
3 हृदयाचे ठोके अनियमित
4 घाबरल्यासारखे वाटणे
5 श्वास घेण्यास समस्या होणे
6 चक्कर येणे

ही आहेत कारणे
1 काही लोकांमध्ये जन्मापासूनच ही समस्या असते
2 हृदयाची इलेक्ट्रिक सिस्टम प्रभावित करणारी एखादी सर्जरी
3 जीन्समध्ये बदल
4 हार्ट अटॅकने हृदयाची गती मंदावणे
5 धमण्यांमध्ये अडथळा
6 हृदयाच्या मांसपेशींमध्ये सूज
7 हार्ट फेल्युअर
8 एखाद्या औषधाचा परिणाम

करा हे नैसर्गिक उपाय
1 जर तुम्हाला हृदयासंबंधी समस्या असेल तर तुम्हाला नियमित चांगला आहार घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही आहाराचं नियोजन करू शकता.
2 लसूण सेवन करावा. याच्या अँंटीकोएगुलेंट गुणामुळे रक्त पातळ होते. लसूण हार्ट अटॅक आणि स्ट्रोकला रोखण्यास सक्षम आहे.
3 हळदीचं नियमित सेवन केल्याने हार्ट ब्लॉकेजची समस्या कमी होते.
4 रिसर्चनुसार रोज एक कप डाळिंबाचं ज्यूस सेवन करावे.
5 रोज 120 मिली ग्रॅम इतकी दालचिनी पावडर सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडचं प्रमाण कमी होतं.
6 लाल मिरचीमध्ये असलेल्या कॅप्सेसिन तत्वामुळे बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होऊ शकतो. कॅप्सेसिन ब्लड प्रेशर कमी करणे, हाय कोलेस्ट्रॉल आणि रक्ताच्या गाठी होत नाहीत.