‘या’ कारणांमुळं पुरुषांना कमी वयातच पडतं ‘टक्कल’ ! जाणून घ्या ‘हे’ सोपे घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    अनेक कारणांमुळं कमी वयातच पुरुषांना केसगळतीचीच समस्या उद्भवते आणि टक्कल पडायला लागतं. यात चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्यात अनियमितता अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. आज आपण याची नेमकी कारणं आणि यावर काही सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

केस गळण्याची आणि टक्कल पडण्याची कारणं –

1) एंड्रोजेनिक एलोपसिया (Androgenetic alopecia)ही समस्या

2) केस पातळ होत असतील तर मेल पॅटर्न बोल्डनेसची (Male pattern baldness) समस्या असू शकते

3) अनुवांशिकता

4) शरीरात आयर्नची कमी

5) डायबिटीस (Diabetes)

6) कुपोषण

7) फंगल इंफेक्शन (Fungal infection)

8) ताण तणाव

9) औषधांचं सेवन

10) हाय ब्लड प्रेशर (High blood pressure (hypertension)). कारण या स्थितीत ब्लड आर्टरीजवर ब्लड फ्लोचा अधिक प्रेशर असतो. ब्लडमध्ये सोडियमचं प्रमाण अधिक असतं. ही स्थिती हृदय आणि केसांच्या आरोग्यासाठी घातक असते.

11) इटींग डिसॉर्डर (Eating Disorder)

12) स्लीम फिट (Slim Fit) शरीराच्या आकर्षणामुळं तरुण एनॉरेक्सिया (Anorexia) आणि बुलिमियासारख्या (Bulimia)इटींग डिसॉर्डरचे शिकार होतात. यात तरुणांमध्ये जास्ती जास्त संख्या ही मुली आणि महिलांची असते.

हे करा उपाय

1) नारळाच्या तेलात 3 ग्रॅम कापूर बारीक करून घाला. हे तेल रोज रात्री केसांना लावून केसांच्या मुळाची मसाज करा. रोज या तेलानं मसाज केली तर फरक दिसून येईल. तसंच यानं केस मऊ आणि मुलायम होतात. केसांना पोषण मिळतं आणि गळती थांबते

2) केस गळणं थांबण्यासाठी 5 टेबलस्पून मेहंदीची पावडर आणि 1 टेबलस्पून लिंबाचा रस तसंच 1 अंड्याचा पांढरा भाग आणि 1 टेबलस्पून मेथी, 4 टेबलस्पून दही घालून रात्रभर भिजवा आणि केसांना लावा. त्यानंतर 2-3 तसांनी केस धुवून टाका. असं केल्यास फरक दिसून येईल. केस चमकदार दिसतील.

3) कोरफडमधील जेल घ्या त्यातील जेल केसांना मुळापासून लावा. 1 तास असंच राहू द्या आणि नंतर शॅम्पूनं केस धुवून टाका. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता. कोरफडीत केसांसाठी आवश्यक अनेक पोषक घटक असतात. यामुळं केसांची वाढ होण्यास मदत होते.

4) केसांना पोषण देण्यासाठी अर्धा कप दही घ्या आणि त्यात 2 टेबलस्पून मेथी घाला. तसंच 3 आवळे घाला. सकाळी याची पेस्ट करा आणि केसांना लावा. हे मिश्रण लावल्यानंतर केसांना 2-3 तास असंच राहू द्या. यामुळं केस कोरडे पडणार नाहीत.

5) लिंबाचा रस आणि नारळाचं तेल मिसळून केसांना लावा आणि 2 तसांनी केस धुवून टाका. त्यामुळं केस गळण्याची समस्या दूर होते. केस दाटही दिसतील.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.