अमरावतीत ‘हा’ फॅक्टर ठरला नवनीत राणा यांच्या विजयाला कारणीभूत

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – अमरावती लोकसभा मतदार संघात यावेळी चुरशीची लढत झाली. या लढतीत युवा स्वाभिमानी आघाडीच्या नवनीत राणा यांनी बाजी मारली. या मतदार संघात शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ, वंचित बहुजन आघाडीकडून गुणवंत देवपारे, युवा स्वाभिमानी आघाडीकडून नवनीत कौर राणा निवडणुकीच्या रिंगणात होते. या लढतीत नवनीत राणा ह्या ३७,२९५ एवढया मतांनी विजयी झालया. शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांना ४,७०,५४९एवढी मते, तर युवा स्वाभिमानी आघाडीच्या नवनीत कौर राणा यांना ५,०७,८४४ एवढी मते मिळाली. या मतदार संघात १८ लाख ३० हजार ५६१ मतदार आहेत. त्यापैकी ११,०४,९३६ मतदारांनी मतदान केले होते.

ऐतिहासिक राजकीय पार्श्वभूमी लाभलेला अन् अनुसूचित प्रवर्गांसाठी राखीव असलेला अमरावती लोकसभा मतदारसंघ हा देशभरातील चर्चित मतदारसंघांपैकी एक आहे . शिवाजी शिक्षण संस्थेचे जनक डॉ. पंजाबराव देशमुख, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील, केरळ, बिहारचे तत्कालीन राज्यपाल रा.सू. गवई यासारख्या दिग्गजांनी एकेकाळी प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघात यावेळी होणारी लढतही चमकदार झाली.अमरावती लोकसभा मतदार संघाची ही निवडणूक लक्षणीय ठरली. माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा चार वेळा खासदार झालेल्या शिवसेनेच्या आनंदराव आडसूळ यांचा पराभव झाला. नवनीत राणा या सर्वात कमी वयाच्या ,चौथ्या महिला खासदार बनल्या आहेत. तितकासा अनुभव नाही कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह नाही तरी देखील या युवा महिला उमेदवाराने आपल्या मेहनतीच्या जोरावर मातब्बर उमेदवाराला पराभूत केले. नवनीत राणा यांच्या विजयात त्यांचे पती रवी राणा यांनी मोलाची साथ दिली.

नवनीत राणा यांच्या विजयाचा फॅक्टर

  • २०१४ साली नवनीत राणा पराभूत झाल्या होत्या मात्र त्यानंतर देखील त्यांनी आपल्या मतदारसंघात तगडा लोकसंपर्क ठेवला होता. मात्र अडसूळ हे मूळचे अमरावतीचे नाहीतच त्यांचा जनतेशी संवाद कमी पडला .
  • नवनीत राणा यांची मेळघाट घट्ट पकड होती. या आदिवासी भागात या राणा दाम्पत्यांनी मोठे सोशलवर्क केले होते त्याचा फायदा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना झाला.
  • अमरावती शहरातून मुस्लिम समाजाचे तसेच तेथिल झोडपट्टी भागातील जनतेने देखील त्यांना साथ दिली.
  • आनंदराव अडसूळ मूळचे अमरावतीचे नाहीत पण नवनीत राणा तिथल्या स्थानिक रहिवासी आहेत. यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांनी देखील त्यांना साथ दिल्याचे सांगितले जात आहे.