Causes of Migrain in Women | महिलांना ‘या’ 4 कारणांमुळे होतो मायग्रेन, जाणून घ्या याची मुख्य लक्षणे आणि बचावाच्या 8 पद्धती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Causes of Migrain in Women | मायग्रेन (Migrain) ही एक अशी समस्या आहे, जी सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. आजच्या काळात वेगवेगळ्या कारणांमुळे तरुणांना मायग्रेनसारख्या आजाराने ग्रासले आहे. मायग्रेनमध्ये डोक्यात एका भागात प्रचंड वेदना होतात, त्यामुळे रुग्णाला डोळे उघडणे कठीण होते. (Causes of Migrain in Women)

 

मायग्रेनचा परिणाम हृदयावरही होत असल्याचे अनेक रिपोर्टमधून समोर आले आहे. खरं तर, जेव्हा मायग्रेनचा त्रास होतो तेव्हा हृदय देखील वेगाने धडधडायला लागते. मायग्रेनची वेदना 2 ते 72 तासांपर्यंत राहण्याची शक्यता असते. आजच्या काळात मायग्रेनचा त्रास स्त्रियांना जास्त होतो.

 

मायग्रेनची महत्त्वाची लक्षणे (Important Symptoms Of Migraine)
मायग्रेनच्या वेदनांदरम्यान, रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या होतात. वेदनांच्या वेळी प्रकाशाचा खुप त्रास होतो. मायग्रेनच्या वेदना दरम्यान, तीव्र डोकेदुखी, अर्ध्या डोक्यात तीव्र वेदना, उलट्या, मळमळ, अस्वस्थता, प्रकाशाचा त्रास होतो. (Causes of Migrain in Women)

 

काही रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मायग्रेनने ग्रस्त असलेल्या महिलांना हृदयविकाराचा त्रास जास्त असतो. ज्या महिलांना मायग्रेनची समस्या आहे त्यांना हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि छातीत दुखण्याचा धोका जास्त असतो. महिलांना मायग्रेन होण्याची काही महत्त्वाची कारणेही आहेत.

 

मायग्रेनची कारणे (Causes Of Migraine)
महिलांमध्ये मायग्रेनची अनेक कारणे असू शकतात, जसे की अनियमित दिनचर्या, खराब आहार, धकाधकीचे जीवन, धूम्रपान, जास्त परफ्यूम वापरणे, कमी झोपणे, जास्त टेन्शन घेणे, हार्मोनल बदल, डोळ्यांवर तीव्र प्रकाश येणे, व्यायामाचा अभाव यामुळे देखील मायग्रेन होऊ शकतो. शरीरात इस्ट्रोजेनची कमतरता हे महिलांना मायग्रेन होण्याचे प्रमुख कारण मानले जाते.

महिलांमधील मायग्रेनची कारणे (Causes Of Migraines In Women)

 

1. पीरियड्स (Periods)
पीरियड्स दरम्यान शरीरात हार्मोन्समध्ये (Hormones) बदल होतात, त्यामुळे मायग्रेन होतो. इतकेच नाही तर मासिक पाळी सुरू होण्याच्या एक-दोन दिवस आधीही महिलांना मायग्रेनचा त्रास होतो.

 

2. मोनोपॉज (Monopause)
मोनोपॉजमुळे महिलांना मायग्रेनसारख्या समस्यांनी ग्रासले असल्याचे अनेक आकडेवारीवरून दिसून येते. मोनोपॉजनंतर महिलांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोन्स अनियंत्रित राहतात, ज्यामुळे मायग्रेन होतो.

 

3. नाश्ता (Breakfast)
अनेकदा महिला त्यांच्या घराच्या आणि ऑफिसच्या कामात गुंतलेल्या असतात, त्यामुळे त्या नाश्ता टाळतात.
अशा स्थितीत अनेक दिवस नाश्ता स्किप केल्यास मायग्रेनचा आजार घेरतो.

 

4. टेन्शन (Tension)
स्त्रिया प्रत्येक गोष्टीचे जास्त टेन्शन घेतात. असे मानले जाते की घर, कुटुंब आणि कार्यालयातील प्रत्येकाचे टेन्शन महिलांवर राहते,
त्यामुळे त्यांना मायग्रेनचा त्रास होतो.

मायग्रेन कसे टाळावे (How To Avoid Migraine)

मायग्रेनपासून दूर राहण्यासाठी निरोगी जीवनशैली निवडा.

जंक फूड आणि तेलकट, मसाल्याच्या पदार्थांपासून दूर राहा.

पेन किलर कमी खा.

सकस व संतुलित अन्न खा.

जास्त प्रकाश आणि मोठ्या आवाजातील संगीतापासून दूर रहा.

कमीत कमी 7 तासांची झोप घ्या.

नियमित व्यायाम आणि योगासने करा.

कोणत्याही प्रकारच्या तणावापासून दूर राहा.

 

Web Title :- Causes of Migrain in Women | women are more prone to migraine due to these reasons know its symptoms and prevention

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Budget 2022 | बजेटमध्ये 39 लाख कोटी रुपयांची सर्वात मोठी रक्कम मिळाली ‘या’ मंत्रालयाला, पहा संपूर्ण तक्ता

 

Reduce Fat | वेगाने फॅट कमी करण्यासाठी उपयोगी आहेत ‘या’ गोष्टी, त्यांचा आहाराच्या यादीत आवश्य करा समावेश

 

Pune Crime | गैरसमजातून दुकान पेटवून देणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल; हडपसर परिसरातील घटना