Causes Of Share Market Crash | मोबाईलने शेअर बाजाराला बनवले जुगाराचा अड्डा, आता आणखी होऊ शकते घसरण – विजय केडिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Causes Of Share Market Crash | या वर्षी सेन्सेक्स (Sensex) आतापर्यंत सुमारे 5,500 अंक कोसळला आहे. प्रसिद्ध गुंतवणुकदार विजय केडिया (Vijay Kedia) यांनी या घसरणी पाठीमागे शेअर ट्रेडिंगला खेळ (Share Trading Become A Game) करून ठेवण्याच्या ट्रेंडला जबाबदार ठरवले आहे. केडिया यांनी ‘इकॉनॉमिक टाइम’ सोबत चर्चा करताना म्हटले की, आज सर्वांच्या हातात जुगार खेळण्याचा डिव्हाईस म्हणजेच मोबाईल आहे (Mobile Is Gambling Device), ज्यामुळे बाजार क्रॅश होत आहे. मोबाईल फोनमुळे जगात सुमारे 95 टक्के लोक वैध जुगारी झाले आहेत. ज्यामध्ये सर्वात जास्त संख्या अमेरिकेत आहे. हे एक प्रकारचे पोकर किंवा तीन पत्ती खेळण्यासारखे झाले आहे. (Causes Of Share Market Crash)
विजय केडिया यांना शेअर बाजारात व्हॅल्यू स्टॉक प्राथमिक स्तरावर निवडण्यासाठी ओळखले जाते. केडिया यांनी म्हटले की, मागील दोन वर्षात कोट्यवधी नवीन वैध जुगारी बाजारात सहभागी झाले आहेत. त्यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले की, ट्रेडिंग अॅप कॅसीनो बनले आहेत. इतके की कॉलेजला जाणारी मुले आणि हाऊस वाईफ सुद्धा आज टेक्निकल्स बाबत बोलत आहेत. ते ट्रेडिंग कोर्स करत आहेत आणि चार्टकडे पहात आहेत, परंतु कुणीही फंडामेंटलबाबत बोलत नाही. हे एक प्रकारच्या ड्रग सारखे आहे. (Causes Of Share Market Crash)
विजय केडिया यांनी हे सुद्धा म्हटले की, सेबीला नवीन आणि छोट्या गुंतवणुकदारांना फ्यूचर अँड ऑपशन ट्रेडिंग करण्यापासून रोखले पाहिजे. मागील काही आठवड्यांमध्ये त्यांची भेट एयरपोर्टवर तैनात एका सीआयएसएफच्या जवानाशी झाली, ज्याचे फ्यूचर आणि ऑपशनमध्ये ट्रेडिंगद्वारे 15 लाख रूपये बुडाले. तर अशाप्रकारे एका शालेय शिक्षिकेचे 42 लाख बुडाले.
—
केडिया यांनी सांगितले की, शेअर बाजारबाबत तुमची जशी धारणा राहील, तसाच तुम्हाला रिटर्न मिळेल. जर तुम्ही यास जुगार समजलात, तर तो तुमच्यासाठी जुगारच ठरेल. मार्केट क्रॅश याचाच परिणाम आहे. आपल्याला आनंद आहे की, 10 कोटी डिमॅट अकाऊंट उघडले गेले आहेत. परंतु आपण हे पहात नाही की, यामध्ये 9.5 कोटी ट्रेडिंग अकाऊंट आहेत, जे रोज खरेदी आणि विक्री करत आहेत. पैसे कमावणे लोकांना सोपे वाटू लागले आहे. लोक असे व्यवहार करत आहेत, जसे की स्टॉक मार्केटमध्ये खुप मोठा पैसा लपून बसला आहे आणि ते हा पैसा काढून आपल्या घरी घेवून जाऊ शकतात.
केडिया असेही म्हणाले की, बुल मार्केटमध्ये बिगनर्स सुद्धा एका रात्रीत जिनियस, सल्लागार, चार्टचे तज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ बनतात.
परंतु बीयर मार्केटमध्ये जिनियस, सल्लागार, चार्ट तज्ज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ सुद्धा बिगनर्स बनतात.
त्यांनी म्हटले की, सुमारे 95 टक्के लोक डोळे बंद करून पैसा लावत आहेत. त्यांना फंडामेंटलबाबत कोणतीही माहिती नाही.
नवीन लोक मुलांप्रमाणे येतात आणि 1 – 2 ट्रेडनंतर ते स्वताला अॅनालिस्ट मानू लागतात.
त्यांनी पुढेही शेअर बाजार चढ – उतार राहण्याची शक्यता वर्तवली.
Web Title :- Causes Of Share Market Crash | vijay kedia take on market crash mobile phones turning d st into gambling den
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update