‘आयकर’ विभागाकडून तुमच्या सोशल मीडियावर नजर ? आयकर विभागानं दिलं ‘हे’ स्पष्टीकरण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमच्या उत्पन्नाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आयकर विभाग तुमच्या सोशल मीडियावरील अकाउंटवर लक्ष ठेवून असते, अशाप्रकारची माहिती मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत होती. मात्र आता यासंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष पी. सी. मोदी यांनी या माहितीला खोटे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी बोलताना म्हटलं कि, आयकर विभाग तुमच्या राहणीमान आणि फिरण्यावर लक्ष ठेवत असेल अशी जर तुमची धारणा झाली असेल तर ती साफ चुकीची आहे. अशाप्रकारे आयकर विभाग कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात लक्ष घालत नाही.

त्याचबरोबर ते म्हणाले की, आयकर विभागाला अशाप्रकारे लक्ष ठेवण्याची काही गरज नाही. कारण आयकर विभागाला विविध संस्थांकडून यासंदर्भातले आकडेवारी मिळत असते. त्यामुळे या आकडेवारीचा हिशोब करण्यासाठी आमच्याकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. यामधून आम्हाला तुम्ही जो काही व्यवहार करता याची माहिती मिळत असते. त्यामुळे आम्हाला या अशाप्रकारे माहिती मिळवण्याची काहीही गरज नाही. काही दिवसांपूर्वी सोशल मोडियामध्ये या संदर्भात माहिती फिरत होती. त्यामुळे सामान्य नागरिक आणि करदात्यांमध्ये भीती पसरली होती.

दरम्यान, या संदर्भात नागरिकांनी कोणतीही काळजी करण्याची गरज नसून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आव्हान देखील त्यांनी केले आहे.

 गोरी त्वचा हवी असेल तर करा हे घरगुती उपाय

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

हृदयाच्या रक्तवाहिनी च्या आजारामुळे होतात छातीत वेदना

आरोग्यदायी जीवनासाठी नियमित दूध घ्यायलाच हवे

चांगल्या आरोग्यासाठी जीम मध्ये जाण्यास वेळ नसेल तर ‘हे’ करा

सावधान ! समुद्रात आंघोळ करणार असाल तर हे तुमच्यासाठीच आहे, जरूर वाचा