Caviar : जगातील सर्वात महाग गोष्टींपैकी एक आहे ‘हे’ फूड, किंमत आणि फायदे करतील हैराण

नवी दिल्ली : कॅविअरला ’श्रीमंतांची डिश’ म्हटले जाते. हे दिसायला आकर्षक असते, तसचे त्याचे सिल्की टेक्स्चर, मोत्यांसारखी चमक आणि फिशी टेस्ट जिभेला वेगळीच चव देते. मात्र कॅविअर सुरूवातीपासूनच श्रीमंतांची डिश नव्हती. एकेकाळी रशियाचे मच्छिमार रोजच्या जेवणात याचे सेवन करत होते. ते उकडलेल्या बटाट्यांसोबत हे रोजच्या जेवणात खात होते. कॅविअरला ’रो’ सुद्धा म्हटले जाते. याचे नाव सुद्धा रशियन मच्छिमाराच्या नावावरूनच पडले होते.

काय आहे कॅविअर
कॅविअर हे ’अनफर्टिलाइज्ड सॉल्ट ऐग’ आहे. कॅविअर मुळ स्वरूपात माशांची अंडी असतात. जी माशांच्या काही प्रजातींपासून मिळतात. सामान्यपणे ती ब्लॅक, ऑलिव्ह ग्रीन, ग्रे आणि ऑरेंज कलरची असतात.

कॅविअर स्टर्जियन प्रजातीच्या माशाकडून मिळतात. सटर्जियन मासा सुमारे 26 वेगवेगळ्या प्रकारचा असतो. मादी स्टर्जियन मासा कॅविअर मिळवण्यासाठी ठेवला जातो. स्टर्जियन माशाचे वय 100 वर्षापेक्षा जास्त असू शकते.

बाजारात विविध प्रकारचे कॅविअर मिळतात. ज्यांची किंमत क्वालिटीवर ठरते. 30 ग्रॅम कॅविअर तुम्हाला सुमारे 8000 ते 18,000 हजार रुपयांच्या दरम्यान मिळू शकते. यामध्ये बेलुगा कॅविअर सर्वात महाग असते, ज्याची किंमत यापेक्षा कितीतरी जास्त असते. मादी स्टर्जियन मोठ्याप्रमाणात अंडी देते, तरीसुद्धा कॅविअरची किंमत इतकी जास्त असते.

याचे कारण हे आहे की, एक मादी मासा अंडी देण्यासाठी किमान 10-15 वर्षांचा काळा घेतो. सुरुवातीला या माशाला मारूनच अंडी काढली जात होती, परंतु आता टेक्निकल अ‍ॅडव्हान्समेंटमुळे फिश फ्रेंडली मेथड वापरून माशाचा जीव न घेता अंडी मिळवली जातात.

कॅविअर टोस्ट किंवा बिस्किटसोबत वाढले जाते. तुम्ही यामध्ये थोडी फ्रेश क्रीम, कापलेला कांदा आणि सजवण्यासाठी फ्रेश हर्ब्सचा वापर सुद्धा करू शकता. या माशाच्या कॅविअरमध्ये शरीराराला लाभदायक असणारे असंख्य घटक आढळतात. यामुळे अनेक आजार दूर राहतात. म्हणूनच याचे महत्व जास्त आहे.