
CBDT ने दिड कोटीपेक्षा जास्त करदात्यांना दिला 1,29,210 कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा, जाणून घ्या टॅक्स रिफंड स्टेटस तपासण्याची प्रक्रिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CBDT | प्राप्तीकर विभागाकडून (Income Tax) ही माहिती देण्यात आली आहे की, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने 1 एप्रिलपासून 29 नोव्हेंबरच्या कालावधी दरम्यान 1.5 कोटीपेक्षा जास्त करदात्यांना 1,29,210 कोटी रुपयांपेक्षा जास्त परत केले आहेत.
प्राप्तीकर विभागाने सांगितले की, 1,13,14,007 प्रकरणात 42,981 कोटी रुपयांचा प्राप्तीकर परतावा जारी केला आहे आणि 1,93,002 प्रकरणात 86,228 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावा जारी केला आहे. प्राप्तीकर विभागाने आपल्या अधिकृत ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.
आयकर विभागाने ट्विट करत सांगितले की, CBDT ने 1 एप्रिलपासून 29 नोव्हेंबरच्या कालावधीदरम्यान 1.5 कोटीपेक्षा जास्त करदात्यांना 1,29,210 कोटी रुपयांपेक्षा जास्त रिटर्न जारी केला आहे. यामध्ये 1,13,14,007 प्रकरणात 42,981 कोटी रुपयांचा प्राप्तीकर रिफंड आणि 1,93,002 प्रकरणांमध्ये 86,228 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावा जारी केला आहे.
आणखी एका ट्विटमध्ये माहिती देत प्राप्तीकर विभागाने म्हटले की,
यामध्ये मूल्यांकन वर्ष 2021-22 चा 79.70 लाख परताव्याचा समावेश आहे, जो 16,691.50 कोटी रुपये आहे.
अनेकदा दिसून येते की, कर भरणार्यांना टॅक्स रिफंड स्टेटस तपासण्यात खुप अडचणीचा सामना करावा लागतो.
परंतु कर भरणारे लोक प्राप्तीकर विभागाच्या टॅक्स इन्फॉर्मेशन नेटवर्कच्या वेबसाइटच्या मध्यमातून अतिशय सहजपणे ऑनलाइन आपल्या रिफंडचे स्टेटस तपासू शकतात.
ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घेवूयात…
काय आहे पूर्ण प्रक्रिया
– रिफंड ट्रॅकिंगसाठी तुम्ही प्राप्तीकर विभागाची वेबसाइट टॅक्स इन्फॉर्मेशन नेटवर्क tin.tin.nsdl.com/oltas/refundstatuslogin.html वर जाऊन पूर्ण माहिती जमवू शकता.
– या पेजवर पॅन कार्ड नंबर (PAN Card) नोंदवावा लागेल.
खालील कॉलमध्ये असेसमेंट ईयर (Assessment Year) भरा आणि नंतर खाली दिलेला कॅप्चा कोड नोंदवा.
अशाप्रकारे तुम्ही टॅक्स रिफंडची स्थिती जाणून घेवू शकता.
– Captcha कोड नोंदवल्यानंतर रिफंडच्या पैशांच्या स्थितीच्या आधारावर, स्क्रीनवर एक मेसेज दिसेल.
Web Title :- CBDT | cbdt issued refund of more than rs 129210 crore to more than 1point5 crore taxpayers know step by step process to check
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update