25 लाखांपर्यंतची ‘TDS’ थकबाकी असलेल्यांवर होणार नाही कारवाई, ‘या’ नियमात झालाय ‘बदल’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) आयकरदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. सीबीडीटीने सांगितले की 25 लाखापर्यंत टॅक्स थकबाकी असल्यास करदात्यावर कोणताही प्रकरण (खटला) चालणार नाही. त्यामुळे सीबीडीटीने ITR च्या नियमांना सोपे केले आहे. यानंतर 25 लाख रुपयांपर्यंत टीडीएसची निश्चित सीमा असलेल्या 60 दिवसांपर्यंत देखील करदात्यावर कोणतेही प्रकरण दाखल करण्यात येणार नाही.

सीबीडीटी जारी केले सूचना पत्र
9 सप्टेंबरला या संबंधित सूचना पत्र जारी करण्यात आले आहे. यात टीडीएस डिफाॅल्टसंबंधित प्रोसेसिंग आणि प्रोसीक्युशनच्या वेळीची सीमा नव्या पद्धतीने निश्चित करण्यात आली आहे. यात सांगण्यात आले आहे, जर एखाद्या करदाता 25 लाख किंवा त्यापेक्षा कमीचा टीडीएस जमा करत नाही तर त्याने तो निश्चित तारखेनंंतर 60 दिवसांच्या आता जमा केल्यास त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात येणार नाही. परंतू एखादा करदाता कारण नसताना टीडीएस भरत नसेल किंवा विलंब करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याला कॉलेजियममधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजूरी आवश्यक आहे.

हा झाला बदल –
1. सीबीडीटीने 25 लाख रुपयांंचा टॅक्स जमा न करणाऱ्याना निश्चित तारखेनंतरचे 60 दिवसात डीटीएस जमा करणाऱ्यांवर कारवाई होणार नाही असा निर्णय घेतला आहे. असे न केल्यास सेक्शन 276 बी अंतर्गत 3 वर्षाचा कठोर कारावास आणि दंड अशा शिक्षाचे तरतूद आहे.

2. जर तुम्ही 25 लाख रुपयांच्या उत्पन्नासंबंधित किंवा 25 लाख रुपयांपर्यंतच्या टीडीएस संबंधित माहिती देत नाहीत तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. 276 सी (1) नुसार 3 महिन्यांपासून 7 वर्षापर्यंतच्या कठोर कारावासाची आणि दंडाची यात तरतूद आहे.

3. जर एखादी व्यक्ती 25 लाखच्या उत्पन्नावरील आयटीआर भरणार नाही तर त्याच्या विरोधात देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सेक्शन 276 सीसी अंतर्गत 3 महिन्यांपासून 7 वर्षापासूनच्या कारावासाची आणि दंडाची यात तरतूद आहे.

अर्थमंत्री सीतारामन यांनी अनेकदा सांगितले की, करदात्यांना कर भरणं आता सोपं केलं आहे. मागील महिन्यात त्यांनी ट्विट करत माहिती दिली की, त्यांनी इमानदार करदात्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी नियम तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच छोट-छोट्या प्रकरणात करदात्यांवर कारवाई करण्यात येईल नये.

बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियावालाला 8.56 लाख रुपयांच्या टीडीएस जमा न केल्यानप्रकरणी मुंबईच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात तीन महिन्यांच्या कारावासाची सुनावणी केली होती. या प्रकरणानंतर सीबीडीटीने करदात्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.