करदात्यांना मोठा दिलासा ! ITR भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यत मुदतवाढ

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. ज्या करदात्यांना अद्याप आर्थिक वर्ष 2020-21 म्हणजेच मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरता आले नाही. अशा करदात्यांसाठी 2021 आर्थिक वर्षासाठी ITR दाखल करण्याची अंतिम मुदत 2 महिन्यांनी म्हणजेच 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविली आहे. यापूर्वी 31 जुलै 2021 पर्यंत ही अंतिम मुदत होती. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कोरोना व लॉकडाउनमुळे आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सीबी़डीटीने ITR भरण्याचा करण्याचा कालावधी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढविला आहे. तर टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्यासाठी डेडलाईन 30 सप्टेंबरवरून 31 ऑक्टोबर केली आहे. तसेच सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी मुदत 31 डिसेंबर 2021 हून वाढवून 31 जानेवारी 2022 केली आहे. प्रायसिंग स्टडी रिपोर्टला ट्रान्सफर करण्यासाठी डेललाईन आता 30 नोव्हेंबर केली आहे. एसएफटीचा कालावधी 31 मेवरून 31 जून केला आहे. रिपोर्टेबल अकाऊंट स्टेटमेंट देण्याची शेवटची तारीख 31 मेच्या ऐवजी 30 जून केली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या चौथ्या तिमाहीत म्हणजेच मार्च 2021 तिमाहीसाठी टीडीएस स्टेटमेट जमा करण्याची डेडलाइन 31 मेवरून 31 जून 2021 केला आहे. तर कर्मचाऱ्यांसाठी फॉर्म-16 जारी करण्याचा कालावधी वाढवला असून तो 15 जूनच्याऐवजी 15 जुलै 2021 केला आहे