कारदात्यांसाठी खुशखबर ! मोदी सरकारनं ‘या’ स्कीमची अंतिम तारीख वाढवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने आयकर भरणाऱ्यांना दंड देऊन आपली फाईल बंद करण्याच्या अंतिम मुदतीमध्ये वाढ केली आहे. ही मुदत आता 31 जानेवारी पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. या आधी ही सुविधा 31 डिसेंबर 2019 पर्यंत देण्यात आली होती मात्र आता याच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.

CBDT ने शुक्रवारी निर्देश जारी करत म्हंटले आहे की, भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI ) च्या प्रादेशिक शाखा आणि इतर संस्थांच्या सल्ल्यानुसार अंतिम मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही अडचणींमुळे करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे सीबीडीटीकडून सांगण्यात आले होते.

सीबीडीटीने असे म्हटले आहे की अशा करदात्यांना फायदा देण्यासाठी आणि न्यायालयासमोर खटल्याचा भार कमी करण्यासाठी कंपाऊंडिंगच्या (दंड घेऊन गुन्हा संपवणे ) सुविधेसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

31 डिसेंबर पर्यंत 1.33 लाख पेक्षा अधिक करदात्यांनी केला अर्ज
सबका विश्वास योजनेंतर्गत पात्र व्यक्तींना त्यांचा योग्य कर जाहीर करुन तरतुदीनुसार देय देण्याची एक वेळ संधी देण्यात आली आहे. मंत्रालयाच्या मते, सेवा कर आणि उत्पादन शुल्क आणि 3.6 लाख कोटी रुपयांची उत्पादन शुल्क असलेली 1.83 लाख प्रकरणे विविध अ‍ॅडहॉक फोरम, अपीलीय न्यायाधिकरण आणि न्यायालयीन मंचांवर प्रलंबित आहेत. अधिकृत माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र 1.84 लाख करदात्यांपैकी 1,33,661 करदात्यांनी 31 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज सादर केले आहेत.

69,550 कोटी रुपयांचा कर अधिकृतपणे भरणाऱ्या या करदात्यांवर 69,550 कोटी रुपयांचा कर लावण्यात आला आहे. योजनेनुसार दिलासा मिळाल्यानंतर 30,627 कोटी रुपयांचा कर भरावा लागणार आहे. मंत्रालयाचे म्हणणे आहे की सबका विश्वास योजनेला करदात्यांनी आतापर्यंतची सर्वात फायदेमंद योजना म्हणून पसंती दिली आहे. सरकारने आतापर्यंत जेवढ्या योजना आणल्या आहेत त्यामध्ये सर्वात उत्तम ही योजना असल्याचे समोर आले आहे. सरकारने योजनेमध्ये करदात्यांनी दाखवलेला प्रतिसाद पाहून म्हंटले आहे की, पात्र करदाते योजनेचा लाभ नक्की उचलतील आणि लवकरात लवकर अर्ज करतील जेणेकरून त्यांना माफीचा फायदा मिळू शकेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/