CBDT Tax Refund | सीबीडीटीने 70 हजार कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड केला जारी

नवी दिल्ली : CBDT Tax Refund | केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 26 लाखापेक्षा जास्त करदात्यांना 70,120 कोटी रुपयांपेक्षा जास्त रिफंड जारी केला आहे. रविवारी एका ट्विटमध्ये प्राप्तीकर विभागाने म्हटले, एकुण रिफंडमध्ये (CBDT Tax Refund) प्राप्तीकर रिफंड 16,753 कोटी रुपये आणि कॉर्पोरेट टॅक्स रिफंड 53,367 कोटी रुपयांचा होता.

ट्विटमध्ये म्हटले आहे की, सीबीडीटीने 1 एप्रिल 2021 ते 6 सप्टेंबर 2021 च्या दरम्यान 26.09 लाखापेक्षा जास्त करदात्यांना 70,120 कोटी रुपयांपेक्षा जास्तचा रिफंड जारी केला आहे. 24,70,612 प्रकरणांमध्ये 16,753 कोटी रुपयांचा आयकर रिफंड जारी करण्यात आला आहे आणि 53,367 कोटी रुपयांच्या कॉर्पोरेट टॅक्स रिफंड जारी केला आहे. 1,38,801 प्रकरणांत तो जारी केला आहे.

आयटी विभागाने आपली टॅक्स प्रोसेसिंग सिस्टम सुधारण्याचा प्रयत्ना केला आहे जो त्वरित मूल्यांकन आणि वेळेवर रिफंडचे समर्थन करत आहे. महामारी पाहता, विभाग प्रक्रियांना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करत आहे. जेणेकरून रिफंड लवकर तयार करता येऊ शकतो आणि करदात्यांची स्थिती ठरवण्यास मदत होऊ शकते.

याशिवाय, प्राप्तीकर रिटर्न दाखल करण्यात करदाते आणि इतर हितधारकांद्वारे रिपोर्ट करण्यात आलेल्या
अडचणी आणि प्राप्तीकर कायदा 1961 च्या अंतर्गत वर्ष 2021-22 साठी ऑडिटच्या विविध रिपोर्टमुळे,
सीबीडीटीने अलिकडेच अनेक गोष्टींचा कालावधी वाढवला आहे, ज्यामध्ये वर्ष 2021-22 साठी प्राप्तीकर रिटर्न फायलिंगचा सुद्धा समावेश आहे.

हे देखील वाचा

EPFO सबस्क्रायबर्ससाठी मोठा दिलासा ! UAN-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या

Pune Crime | गणेश मूर्ती विक्री दुकानातून महिलेने केले 50 हजार रुपये लंपास

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : CBDT Tax Refund | cbdt issued tax refund rs 70 thousand crore

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update