मनी लाँड्रिंगच्या मोठ्या रॅकेटचा खुलासा ! बनावट चीनी कंपन्यांच्या आधाराने अरबो रूपयांचे हवालाचे व्यवहार
नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात मनी लाँड्रिंगच्या एका मोठ्या रॅकेटचा खुलासा झाला आहे. या रॅकेटद्वारे 1000 कोटींपेक्षा जास्त हवाला ट्रांजक्शन उघड झाले आहे. अरबो रूपयांच्या या हवाला रॅकेटमध्ये अनेक चीनी नागरिक, त्यांचे भारतीय साथीदार, बँक कर्मचारी इत्यादी आरोपी सहभागी असल्याचे समोर आले आहे. हे मनी लाँड्रिंग शेल कंपन्यांद्वारे होत होते. हवाला व्यवसाय करणार्या काही कंपन्यांवर इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) ने मंगळवारी सायंकाळी म्हटले की, चीनी कंपन्यांच्या सहकारी कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित लोकांनी बनावट कंपन्यांद्वारे भारतात रिटेल शोरूम उघडण्याच्या नावावर 100 कोटी रुपयांची बनावट अॅडव्हान्स घेतले होते. सीबीडीटीने म्हटले की, सर्च ऑपरेशन ठोस माहितीच्या आधारावर करण्यात आले, ज्यामध्ये म्हटले होते की, काही चायनीज नागरिक आणि त्यांचे भारतीय साथीदार बनावट कंपन्यांच्या आधाराने मनी लाँड्रिंग आणि हवाला व्यवसायात सहभागी आहेत. काही बँक अधिकार्यांवर सुद्धा छापेमारी करण्यात आली आहे.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिल्ली, गाझियाबादसह अनेक वेगवेगळ्या ठिकाणांवर छापेमारी केली. म्हटले जात आहे की, हे एक खुप मोठे रॅकेट आहे जे बनावट कंपन्यांच्या आधाराने अरबो रूपयांचा हवाला व्यवसाय करत होते. अधिकार्यांनी सांगितले की, चायनीज लोकांच्या सांगण्यावरून सुमारे 40 बँक अकाऊंट डमी संस्थांच्या नावावर उघडण्यात आली. या अकाऊंटवर सुमारे 1000 कोटी रूपये क्रेडिट केले गेले आहेत.
सीबीडीटीने म्हटले की, हवाला व्यवहार आणि मनी लाँड्रिंगची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत, ज्यामध्ये बँक अधिकारी आणि चार्टर्ड अकाऊंटची सक्रिय भूमिका आढळून आली आहे. परदेशी हवाला व्यवहाराचे पुरावे मिळाले आहेत, ज्यामध्ये हाँगकाँग आणि यूएस डॉलरचा समावेश आहे.