CBI नं महिला पोलिस अधिकार्‍यासह 2 पोलीस कर्मचार्‍यांना केली अटक; बलात्काराच्या आरोपीकडून लाच घेतल्याचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CBI | दिल्ली पोलीस दलाच्या मालवीय नगर पोलीस ठाण्यातून (Malviya Nagar Police Station) एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. सीबीआय (CBI) ने दिल्ली पोलिसां (Delhi Police) च्या एका महिला एसआय (female SI) आणि पुरुष एएसआय (male ASI) ला बलात्काराच्या आरोपीकडून (rape accused) लाच (bribe) घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली.

 

 

या दोघांनी दिल्ली पोलीस (Delhi Police) दलातील एक महिला कॉन्स्टेबलवर झालेल्या बलात्कारातील आरोपी असलेल्या एका सब-इन्स्पेक्टरचे प्रकरण कमजोर करण्यासाठी कथितप्रकारे लाच मागितली होती.

 

 

अचानक धडकले सीबीआय अधिकारी
CBI अधिकारी शनिवारी रात्री अचानक दिल्लीच्या मालवीय नगर पोलीस ठाण्यात धडकले आणि तिथे तैनात एका महिला सब-इन्स्पेक्टरसह एका पुरुष एएसआयला अटक केली आहे. या दोघांवर दिल्ली पोलीसातील एक महिला कॉन्स्टेबलवरील बलात्कारातील आरोपी एक अन्य एसआयकडून कथित प्रकारे लाच घेण्याचा आरोप आहे.

 

 

एलपीसीवर केला होता सब-इन्स्पेक्टरने बलात्कार
माहितीनुसार, सीबीआयने ज्या महिला एसआयला अटक केली आहे, ही अधिकारी दिल्ली पोलीसातील महिला कॉन्स्टेबलवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा तपास करत होती.

 

 

जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण
याच वर्षी ऑगस्ट महिन्यात साऊथ दिल्लीच्या हौज खास पोलीस ठाण्यात (Hauz Khas police station in South Delhi) तैनात एका महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले होते. या दरम्यान पीडित महिला कॉन्स्टेबलने पोलीस ठाण्यातील सब इन्स्पेक्टरवर बलात्काराचा आरोप केला होता.

 

 

थंड पेयातून दिले गुंगीचे औषध आणि…
महिला कॉन्स्टेबलच्या आरोपानुसार, मनोज कुमार नावाच्या सब इन्स्पेक्टरने (sub-inspector Manoj Kumar) इमर्जन्सी ड्यूटीच्या दरम्यान तिला कॉल केला आणि तिला घेऊन तो मुनिरका येथील एक घरात घेऊन गेला.

 

 

या दरमयान मनोजने तिला थंडपेय दिले, जे प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली.
यानंतर आरोपी सबइन्स्पेक्टर मनोजने तिच्यावर बलात्कार केला (Sub-Inspector Manoj kumar raped ladies constable) आणि आक्षेपार्ह स्थितीतील फोटोही काढले होते.

 

 

दिल्ली पोलिसांची प्रतिमा डागाळली
मात्र, महिला एसआयने आपल्याच विभागातील एका महिला कॉन्स्टेबरवर बलात्कार करणार्‍या
पोलीस अधिकार्‍याकडून लाच घेतल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
दिल्ली पोलिसांच्या या प्रकरणावर जनमानसातून जोरदार टिका होत असून संताप व्यक्त होत आहे.

 

Web Title :- CBI | 2 delhi police personal arrested by cbi for taking bribe from si who accused of rape case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Rains | माजी आमदार मोहन जोशी यांची पुणे BJP वर खरमरीत टीका; म्हणाले – ‘पावसाने केला भाजपच्या अपयशाचा पंचनामा’

Moshi-Chandoli Toll Plaza | मोशी आणि चांडोली येथील दोन्ही टोलनाके कायमस्वरूपी बंद !

Jalgaon Police Recruitment | WhatsApp च्या माध्यमातून पोलिस भरतीचा पेपर सोडविण्याचा प्रयत्न; उमेदवाराला रंगेहाथ पकडलं (व्हिडीओ)