CBI Arrest IAS Dr. Anil Ramod | अबब ! डॉ. अनिल रामोडच्या 3 घरात सापडला कोटयावधीचा ‘खजाना’ (Cash), 14 स्थावर मालमत्तेची कागदपत्रे; सीबीआयकडून ‘इतक्या’ कोटींची रोकड जप्त

पुणे (नितीन पाटील) – CBI Arrest IAS Dr. Anil Ramod | पुण्याच्या महसूल विभागातील (Maharashtra Pune Revenue Department) अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड (IAS Anil Ganpatrao Ramod) यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) Central Bureau of Investigation (CBI) पथकाने शुक्रवारी 8 लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे (Pune Bribe Case). त्यानंतर डॉ. अनिल रामोड यांच्या पुण्यातील 3 घरांच्या झडतीमध्ये सीबीआयला तब्बल 6 कोटी रूपये कॅश आणि 14 स्थावर मालमत्तेची कागदपत्रे आढळून आली आहेत. सीबीआयने कॅश आणि कागदपत्रे जप्त केली असून बँक खात्यांची पडताळणी होणे बाकी आहे (Pune Crime News). 14 स्थावर मालमत्ता या डॉ. रामोड आणि त्यांच्या कुटूंबियांच्या नावे आहेत. दरम्यान, डॉ. अनिल रामोड यांना शनिवारी शिवाजीनगर येथील न्यायालयात (Pune Shivaji Nagar Court) हजर करण्यात येणार आहे. (CBI Arrest IAS Dr. Anil Ramod)

याबाबत अधिक माहिती अशी की, माळशिरस येथील एका शेतकर्‍याच्या (Malshiras Farmer) जमिनीचे भू-संपादन झाले होते. त्याचा मोबदला लवकर देण्यासाठी डॉ. रामोड यांनी 10 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 8 लाख रूपये घेण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदाराने सीबीआयकडे तक्रारी दिली. शुक्रवारी 8 लाख रूपयाची लाच घेताना डॉ. रामोड यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्यांच्या औंध-बाणेर (Aundh-Baner) येथील ऋतुपर्ण सोसायटी (Rutuparna Society Pune) येथील बंगल्यावर आणि नांदेड (Nanded) येथील घराची सीबीआयने झाडाझडती घेतली. (CBI Arrest IAS Dr. Anil Ramod)

 

सीबीआयच्या पथकाला तब्बल 6 कोटी रूपयांची रोकड डॉ. रामोड यांच्या 3 निवासस्थानावर आढळून आली. त्यामध्ये त्यांच्या सरकारी निवास्थानाचा देखील समावशे आहे. सीबीआयला डॉ. रामोड आणि त्यांच्या कुटूंबियांच्या नावे असेलेल्या 14 स्थावर मालमत्तेची कागदपत्रे देखील मिळून आली आहे. सीबीआयने रोकड आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली आहे. (CBI Seized Property Of IAS Dr. Anil Ramod)

 

सीबीआयमधील डीआयजी सुधीर हिरमेठ (IPS Sudhir Hiremath)
यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, डॉ. अनिल रामोड
यांना शनिवारी शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
महसूल विभागातील बडया अधिकार्‍याला 8 लाखाच्या लाच प्रकरणी सीबीआयने
अटक केल्यामुळे राज्य महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. (CBI Seized Six Core Cash Of IAS Dr. Anil Ramod)

 

 

Web Title : CBI Arrest IAS Dr. Anil Ramod | Cash worth six crores found in 3 houses of IAS Dr Anil Ramod, 14 real estate documents; CBI seizes lot of crores cash

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा