CBI Arrest SP And Inspector of Central GST In Kolhapur | 50 हजाराच्या लाचप्रकरणी GST अधीक्षकासह निरीक्षकास अटक; कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये CBI ची कारवाई

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – CBI Arrest SP And Inspector of Central GST In Kolhapur | सेवा कर दायित्वाबाबतचे
Goods and Services Tax (GST) प्रकरण निकाली काढण्यासाठी तब्बल 50 हजाराच्या लाचप्रकरणी केंद्रीय जीएसटी अधीक्षक (Central GST Superintendent) आणि निरीक्षक (Central GST Inspector) जाळ्यात सापडले आहेत. याप्रकरणी सीबीआयने Central Bureau of Investigation (CBI) दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrested) केली आहे. ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) जयसिंगपूर (Jaisingpur) येथे करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. (CBI Arrest SP And Inspector of Central GST In Kolhapur)

 

याबाबत माहिती अशी की, 2017 – 18 ते 2020 – 21 या वर्षासाठीच्या सेवा कर दायित्वाबाबतचे प्रकरण निकाली काढण्यासाठी कर सल्लागारामार्फत 75 हजाराची अवाजवी रकमेची मागणी करण्यात आली. यानंतर जीएसटी अधीक्षक आणि निरीक्षक यांनी फिर्यादी आणि त्याचा कर सल्लागार यांच्याशी लाचेच्या रकमेची वाटाघाटी करत 50 हजाराची मागणी केली. यादरम्यान फिर्यादीने याबाबत तक्रार 28 एप्रिल रोजी दिली. तसेच अवाजवी लाभाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला.

या तक्रारीवरुन, सीबीआयने (CBI) सापळा रचला आणि सेंट्रल जीएसटीच्या निरीक्षकाला तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
त्यानंतर अधीक्षकांनाही ताब्यात घेण्यात आले.
अटक केल्यानंतर दोन्ही आरोपींची झडती जयसिंगपूर आणि कोल्हापूर येथे घेण्यात आली.
त्यामध्ये दोषी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, दोन्ही आरोपींना आज जयसिंगपूर विशेष न्यायाधीश (Jaisingpur Special Judge) यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

 

Web Title :- CBI Arrest SP And Inspector of Central GST In Kolhapur | The Central Bureau of Investigation has arrested a Superintendent and an Inspector both of Central GST Jaisingpur of Kolhapur (Maharashtra) in a bribery case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा