Post_Banner_Top

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी CBIकडून ‘सनातन’च्या वकिलासह दोघांना अटक

मुंबई : वृत्तसंस्था – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयच्या पथकाने दोघांना मुंबईतून अटक केली. यात सनातनचे वकील हिंदूू विधिज्ञ परिषदेचे अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांचा समावेश आहे. या दोघांना सीबीआयच्या पथकाने दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे.

२० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास महर्षि विठ्ठल रामजी शिंदे  पुलावर हल्लेखोरांचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर सीबीआयने सनातनचा साधक डॉ. विरेंद्र तावडे याच्यासह सचिन अंदूरे आणि शरद कळसकर यांना अटक केली होती. त्यांच्याविरोधात दोषारोपपत्रही दाखल केले होते. औरंगाबाद येथील सचिन अंदूरे आणि शरद कळसकर यांनीच गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला होता. गौरी लंकेश हत्या प्रकऱणातील आरोपी अमोलकाळे याने त्यांना दुचाकी आणि पिस्तूल पुरविल्याचा दावा सीबीआयने केला होता. तर नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी पकडलेल्या सनातचा साधक वैभव राऊत याचाही यात सहभाग असल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले होते.

दरम्यान सनातनशी संबंधित असलेल्या अड. संजीव पुनाळेकर यांना सीबीआयने मुंबईतून अटक केली. त्यांच्यासोबत आता विक्रम भावे या दोघांना सीबीआयने आता अटक केली. याप्रकरणात त्यांचा काय सहभाग आहे. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यांना सुट्टीकालीन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अशी माहिती दिली.

कोण आहेत संजीव पुनाळेकर
अ‍ॅड. संजीव पुनाळेकर हे हिंदू विधिज्ञ परिषदेचे परिषदेचे वकील. त्यासोबतच त्यांचा सनातनशी संबंध. संजीव पुनाळेकर यांनी कॉमरेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी साक्षीदार असलेल्या मुलाची काळजी घेण्याचे पत्र पोलिसांना पाठविले होते. तर सीबीआयने यापुर्वी अटक केलेल्या सनातनच्या कार्यकर्त्यांची बाजू ते न्यायालयात मांडत होते. त्यांनी त्यावेळी सीबीआयवर अनेक आरोपही केले होते.

Loading...
You might also like