बिल्डरकडून लाच मागितल्याच्या आरोपाखाली CBI कडून भाजपच्या नगरसेवकाला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   दिल्लीत केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (सीबीआय) लाच प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेवकाला अटक केली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने लाचखोरी प्रकरणात भाजप नेते आणि नगरसेवक मनोज महलावत यांना वसंत कुंज, नवी दिल्ली येथून अटक केली आहे.

इंडिया टुडेला समजले आहे की, मनोज महलावत यांनी बांधकाम कामासंदर्भात एका व्यक्तीकडून दहा लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यांना रंगेहात पकडण्यासाठी तपास यंत्रणेने सापळा रचला होता.

वसंत कुंज येथे एक बिल्डर बेकायदा बांधकाम करीत असल्याचा आरोप आहे. नगरसेवकाने त्याच्याकडे पैसे मागितले. बिल्डरने सांगितले की, आम्ही केवळ नगरसेवकांना पैसे देऊ. नंतर बिल्डरने सीबीआयकडे तक्रार केली आणि यामुळे त्याला रंगेहाथ पकडले गेले.

सूत्रांनी सांगितले की, मनोज महलावत यांना सीबीआयने रंगेहाथ पकडले आणि अटक केली. मनोज महलावत यांना आता लाचप्रकरणी अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे. मनोज महलावत 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर नवी दिल्लीतील वसंत कुंज येथून नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी वसंत कुंज येथील त्याच्या घराची झडतीही घेतली, तेथून त्याला अटक केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

भ्रष्टाचाराविरुद्ध केलेल्या कारवाईत गेल्या काही महिन्यांत केंद्रीय अन्वेषण विभागाने कायदा अंमलबजावणी संस्थेच्या अधिकाऱ्यांसह अनेक सरकारी अधिकाऱ्यांना अटक केली आहे.