सीबीआय भ्रष्टाचार प्रकरणी पोलिस उपअधीक्षकास अटक

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था – केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (सोमवारी) पोलिस उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांना अटक करण्यात आली असुन प्रचंड खळबळ उडाली आहे. सीबीआयचे विशेष संचालक आणि उच्चपदस्थ अधिकारी राकेश अस्थाना यांच्यावर तब्बल 3 कोटी रूपयांची लाच घेतल्याचा आरोप असुन त्याच प्रकरणी देवेंद्र कुमार यांना अटक करण्यात आली आहे.

दुष्काळ जाहीर करण्यास चंद्रकांत पाटील मुहूर्ताची वाट का बघत आहेत ? : अजित पवार

पंतप्रधानांनी थेट सीबीआयचे संचालक आणि उपसंचालकांना बोलावून घेतले होते. त्यामुळे चर्चेला उधाण आले असून वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. मोइन कुरेशी यांच्याकडून 3 कोटी रूपयांची लाच घेतल्याचा आरोप अस्थाना यांच्यावर आहे. कुरेशी हे मांस निर्यातदार आहेत. रविवारी सीबीआयनेच आस्थाना यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. हैदराबादचे प्रसिध्द उद्योगपती सतीश बाबू सना यांनी दिलेल्या तक्रारीवरून अस्थाना यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सीबीआयने मनोज प्रसाद याला दुबई येथुन अटक केलेली आहे. सना यांनी दिलेल्या तक्रारीत प्रसाद आणि त्याचा भाऊ सोमेश यांनीच मध्यस्थी करून अस्थाना यांना कुरेशी यांच्याकडून पैसे पुरवल्याचे नमुद करण्यात आलेले आहे. त्यानंतरच सीबीआयने अस्थाना यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अस्थाना यांच्यासह एसआयटीचे उपअधीक्षक देवेंद्र कुमार आणि इतर संशयितांविरूध्द रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवेंद्र कुमार यांच्यावर सतीश सना यांचा बनावट जबाब तयार केल्याचाही आरोप आहे.