CBI भ्रष्ट खासदार,नोकरदारांवर खटला चालवण्यासाठी मंजुरीच्या प्रतिक्षेत

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – सीबीआय सध्या भ्रष्ट खासदार आणि नोकरदारविरोधात खटला चालवण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी प्रतीक्षा करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भ्रष्टाचाराबाबत 58 प्रकरणांमध्ये 130 हुन अधिक नेत्यांवर,सेवा निवृत्त अधिकाऱ्यानावर खटका दाखल केला जाणार आहे. सीबीआय या संबंधित विभागाकडून याबाबत मंजुरी मिळावी यासाठी प्रतीक्षा करत आहे.

या विभागाकडून मजुरी अद्याप मिळालेली नाही
30 नोव्हेंबर 2019 पर्यंतच्या आयोगाच्या आकडेवारीनुसार, त्यातील जास्तीत जास्त नऊ प्रकरणे केंद्रीय कार्मिक मंत्रालयाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचबरोबर आठ महामंडळ बँका आणि सहा उत्तर प्रदेश सरकारच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहेत.

या व्यतिरिक्त पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदाकडे चार, संरक्षण मंत्रालय तीन, रेल्वे मंत्रालय, बिहार सरकार आणि जम्मू-काश्मीर सरकारकडे दोन दोन प्रकरणे प्रलंबित आहेत.

या तीन खासदारांवर कारवाई करण्यासाठी पाहिजे मंजुरी
सीबीआयला सध्याच्या विद्यमान खासदारांवर कारवाई करण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. यामध्ये विद्यमान खासदार सौगत रॉय, काकोली घोष दस्तीदार आणि प्रसून बनर्जी यांच्यासोबत माजी खासदार सुवेणु अधिकारी यांच्या विरोधात 6 एप्रिल 2019 पासून खटला चालवण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. रॉय, घोष और बनर्जी हे तृणमूल कांग्रेसचे लोकसभा सदस्य आहेत तर अधिकारी हे पश्चिम बंगालचे परिवह मंत्री आहेत.

एएमयुचे माजी कुलगुरू देखील संशयाच्या भोवऱ्यात
या व्यतिरिक्त 23 ऑक्टोबर 2018 पासून अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू नसीम अहमद यांच्यावर खटला चालविण्यासाठी सीबीआय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा करीत आहे. तसेच एका प्रकरणामध्ये सीबीआय गेल्या वर्षीच्या 22 जानेवारीपासून दिल्ली सरकारचे एक रजिस्ट्रार,एक वकील आणि दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात खटला दाखल करण्यासाठी मजुरीची प्रतीक्षा करत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –