51 ‘टॉप’च्या कंपन्या CBI च्या ‘हिटलिस्ट’वर, 1038 कोटी रुपये ‘हॉंगकॉंग’ला पाठविल्याचा ‘आरोप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने 2014-2015 या वर्षात 1038 कोटींचा काळा पैसा हाँगकाँगमध्ये पाठवल्याच्या आरोपाखाली 51 कंपन्यांची नावं फायनल केली आहेत. सोमवारी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. सदर 51 कंपन्यांवर असा आरोप आहे की, तीन सरकारी बँका-बँक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकेच्या अज्ञात अधिकाऱ्यांच्या मदतीने 1038 रुपयांचा बेहिशोबी काळा पैसा हाँगकाँगला पाठवण्यात आला आहे. या युनिट्समधील अधिकाधिक मालक हे चेन्नईतील निवासी आहेत.

सीबीआयला माहिती मिळाली होती की, 51 युनिट्समधील 48 चालू खाती 1038.34 कोटी रुपयांची रक्कम बाहेर पाठवण्यासाठी या बँकांच्या चार शाखांमध्ये उघडण्यात आली होती. सीबीआयने आरोप केला आहे की, 24 खात्यांचा वापर वस्तूंच्या आयातीसाठी आगाऊ रक्कम परदेशात पाठवण्यासाठी केला गेला. याअंतर्गत 488.39 कोटी रुपयांची रक्कम डॉलरमध्ये पाठवण्यात आली होती. तर 27 खात्यांचा वापर भारतीय पर्यटकांच्या परदेशी यात्रेसाठी 549.95 कोटी रुपयांची रक्कम पाठवण्यासाठी करण्यात आला.

स्विस बँकेत पैसे ठेवणाऱ्या भारतीयांना झटका

स्वित्झर्लंडमधील टॅक्स अधिकारी अशा माणसांची बँकविषयक माहिती भारतीय टॅक्स अधिकाऱ्यांसोबत शेअर करत आहेत जे टॅक्स चोरी करून इथून बाहेर पळून गेले आहेत. भारत आणि स्वत्झर्लंडच्या टॅक्स अधिकाऱ्यांनी अशा संस्थांची ओळख पटवली आहे जे टॅक्स चोरी करून सुरक्षित देशात जाऊन स्विस बँकेत काळा पैसा ठेवतात. अशा संस्थांना स्वित्झर्लंडच्या कर अधिकाऱ्यांनी नोटीसा जारी केल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/