CBI च्या मुख्यालयातील ‘लॉकअप नंबर 5’ मध्ये ‘अशी’ काढली चिदंबरम यांनी ‘रात्र’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – INX मीडिया प्रकरणी आरोप असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना अखेर सीबीआयने अटक केली असून दोन तासांच्या दीर्घ नाटकीय घडामोडीनंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री उशिरा त्यांना सीबीआयच्या मुख्यालयात नेण्यात आल्यानंतर त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एकही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

अटक केल्यानंतर असा होता घटनाक्रम

1) चिदंबरम यांना अटक केल्यानंतर ते अतिशय शांत होते. त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांची देखील त्यांनी उत्तरे दिली नाहीत.

2) त्यांना अटक करून सीबीआयच्या मुख्यालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा रक्तदाब तपासला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

3) यावेळी त्यांना सीबीआय अधिकाऱ्यांनी कम्फर्टेबल आहात कि नाही असे विचारले असता त्यांनी अतिशय कमी उत्तरे दिली.

4) त्यानंतर त्यांना सीबीआयच्या पाच नंबरच्या लॉकअपमध्ये रात्रभर ठेवण्यात आले. त्याचबरोबर सीबीआयचे अधिकारी देखील त्यांच्यावर लक्ष ठेवून होते.

5) आज 10 वाजता त्यांची पुन्हा चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यावेळी सीबीआय त्यांची 14 दिवसांची कोठडी मागणार आहे.

You might also like