मोठी कारवाई ! PM मोदींच्या आदेशानंतर CBI अ‍ॅक्शनमध्ये, एकाच वेळी 150 सरकारी विभागात ‘छापेमारी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीआयने आज (शुक्रवार) एक विशेष अभियान राबवून देशभरातील 150 जागांवर आश्चर्यचकारकरित्या तपासणी केली, ही तपासणी त्या ठिकाणी केली गेली जेथून भ्रष्टाचारासंबंधित तक्रारी येत होत्या. हा तपास रेल्वे, खनीकर्म, फूड कॉर्पोरेशन, सार्वजनिक बँकांसह 29 विभागात करण्यात आला. देशातील भ्रष्टाचार संपवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सीबीआयने हे पाऊल उचलले. या तपासणीत काय काय उघड झाले याची माहिती अजून समोर आली नाही.

या विभागांची केली तपासणी –
सीबीआयने ज्या विभागांची तपासणी केली त्या रेल्वे, कोल माइन, मेडिकल संस्था, कस्टम विभाग, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ईएसआयसी, परिवहन, डायरेक्टर ऑफ असेस्ट्स, रजिस्टर ऑफिस, इंडस्ट्रीज डिपार्टमेंट ऑफ एनसीटी, जीएसटी विभाग, पोर्ट ट्रस्ट, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, डीएवीपी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या, बँका, वित्तीय संस्था, कृषि, शिपिंग, बीएसएनएल, स्टील, माइन्स अ‍ॅण्ड मिनरल्स यांचा समावेश आहे.

या शहरांत केली तपासणी –
सीबीआयने दिल्ली, पुणे, मुंबई, नागपूर, जयपूर, जोधपूर, गुवाहाटी, श्रीनगर, शिलाॅंग, चंदीगड, शिमला, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरु, रांची, गाजियाबाद, डेहराडून, लखनऊ या शहरात तपास केला.

आरोग्यविषयक वृत्त –