मुंबईत 3 आयकर निरीक्षकांना 15 लाखांची लाच घेताना CBI कडून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   आयकर विभागामार्फत करण्यात येत असलेल्या चौकशीत मदत करण्यासाठी दोन आयकर अधिकाऱ्यांना 15 लाखांची लाच स्विकारताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून अटक केली आहे. सीबीआयने केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे आयकर खात्यात खळबळ उडाली आहे. सीबीआयने आयकर विभागात कार्यरत असलेल्या दोन निरीक्षकांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले आहे. हे दोन्ही अधिकारी मुंबईतील बलार्ड पियर येथील आयकर कार्यालयात कार्यरत होते.

सीबीआयने आयकर विभागातील तीन निरीक्षकांच्या विरोधात लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे तिन्ही आरोपी बलार्ड पियर येथील आयकर कार्यालयात कार्यरत आहेत. आयकर विभागामार्फत करण्यात येत असलेल्या चौकशीत तक्रारदारास मदत करण्यासाठी या तिघांनी 15 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

लाचेची रक्कम ठरल्याप्रमाणे आयकर विभागातील हे अधिकारी लाच स्विकारण्याच्या तयारीत असताना सीबीआयने सापळा रचून आरोपींना लाच घेताना रंगेहाथ पडकले. 10 लाख रुपयांची लाच स्विकारताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सीबीआयने रंगेहाथ पकडले. तसेच 5 लाख रुपये रोख तक्रारदाराकडून जप्त करण्यात आले. सीबीआयने ही कारवाई करताना एक आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सीबीआय अधिकाऱ्यांनी त्याला लगेच पकडले.