डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील आरोपींना १ जून पर्यंत सीबीआय कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणात विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या दोघांना शनिवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली. आज या दोघांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पुनाळेकर आणि भावेला १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.

पुणे न्यायालयात सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला. तर संजीव पुनाळेकर याने स्वत:च आपली बाजू न्यालयासमोर मांडली. सरकारी वकीलांनी युक्तीवाद करताना संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे याने रेकी करण्यासाठी मारेक-यांना मदत केली. मारेक-यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करायाची आहे. तसेच आरोपींनी गुन्ह्यात वारलेले पिस्तूल मुंबईच्या खाडीत नष्ट केले. ती कशा पद्धतीने नष्ट केले याचा तपास करायचा आहे. यासाठी या दोघांना कोठडी द्यावी असा युक्तीवाद सरकारी वकीलांनी न्यायालयात केला.

संजीव पुनाळेकर याने न्यायालयात युक्तीवाद करताना म्हटले की, सीबीआयने आरोपींची आठ महिने चौकशी केली. त्यांचा जबाब नोंदवून घेताला. मग मला अटक करण्यासाठी सीबीआयला आठ महिने का लागले असा सवाल करत त्याने युक्तीवाद केला. न्यायालयाने दोघांचा युक्तीवाद ऐकून घेत १ जून पर्य़ंत सीबीआय कोठडी सुनावली.

संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. संजीव पुनाळेकर हे दाभोळकर हत्याकांडातील आरोपींचेही ते वकील आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींच्या जबानीतून पुनाळेकरचे नाव समोर आले होते. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे.

Loading...
You might also like