INX Media Case : पी. चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत CBI कोठडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बेपत्ता पी चिदंबरम यांना तब्बल 30 तासानंतर सीबीआयने बुधवारी (दि.२१) रात्री पावणे दहाच्या सुमारास ताब्यात घेतले. यानंतर आज (गुरुवार) त्यांना सीबीआय न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सीबीआयने न्यायलयाकडे चिदंबरम यांची 5 दिवसाची कोठडी मागितली होती यानंतर न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

सीबीआयकडून सांगण्यात येत आहे की, चिदंबरम यांनी तपासात सहकार्य केले नाही. तसेच सीबीआयकडून पाच दिवसांची कोठडी आणि अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. सुनावणीच्यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा कार्ति चिदंबरम उपस्थित होते. चिदंबरम यांच्यासोबत त्याचे चार वकील देखील उपस्थित होते.

चिंदबरम यांना ताब्यात घेण्यासाठी बुधवारी रात्री सीबीआयचा चांगलाच हायव्होलटेज ड्रामा देशाला पाहायला मिळाला. मोठ्या प्रयत्नानंतर सीबीआयने चिदंबरम यांना ताब्यात घेतले. या प्रकरणावर सीबीआयचे प्रश्नही तयार नाहीत. चिदंबरम यांना चौकशी दरम्यान फक्त 12 प्रश्न विचारले आहेत, म्हणजे त्यांना विचारायला सीबीआयकडे प्रश्न तयार नाहीत, अशी बाजू वकील कपिल सिब्बल यांनी मांडली.

पि. चिदंबरम हे बेपत्ता झाल्यानंतर सीबीआयने लूकआऊट नोटीस बजावली होती. मात्र, २७ तासानंतर चिदंबरम काँग्रेस मुख्यालयात हजर झाले. याठिकाणी त्यांनी पाच मिनीटांची पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर झालेल्या आरोपांचे खंडण केले होते. तसेच मी आणि आपल्या मुलावर खोटे आरोप करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले होते. पत्रकार परिषदेनंतर चिदंबरम हे लगेच आपल्या घरी निघून गेले. दरम्यान, सीबीआयचे पथक काँग्रेस भवानात त्यांना अटक करण्यासाठी पोहचले होते. मात्र, त्या ठिकाणी ते नसल्याने त्यांनी चिदंबरम यांना त्यांच्या निवासस्थातून ताब्यात घेण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त –