Subodh Kumar Jaiswal : ‘CBI अधिकाऱ्यांना दाढी वाढवता येणार नाही, स्पोर्ट्स शूज किंवा चप्पल चालणार नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) अधिकाऱ्यांना येथून पुढे जीन्स, स्पोर्ट्स शूज किंवा चप्पल घालता येणार नाही. सीबीआयचे नवनिर्वाचित संचालक सुबोधकुमार जयस्वाल ( Jaiswal) यांनी पदभार स्विकारताच आपल्या अधिकाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. जयस्वाल ( Jaiswal) यांनी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गणवेशाच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल केले आहेत.

लाचखोरीला आळा बसणार ! पुणे पोलीस कॅशलेस होणार, ‘Google Pay’ वरुन भरता येणार दंडाची रक्कम

फॉर्मल कपडे परिधान करावेत

सीबीआयमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर येताना फॉर्मल कपडे परिधान करावेत.

कार्यालयात जीन्स, टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शूज किंवा चप्पल चालणार नाहीत, असे आदेश सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिले आहेत.

जयस्वाल यांनी मंजूरी दिलेलं एक परिपत्रक सहाय्यक संचालक (प्रशासन विभाग) अनूप टी मॅथ्यू यांनी जारी केलं आहे.

जामीनावर आला होता बाहेर, पुन्हा जेलमध्ये जाण्यासाठी आता PM मोदींना दिली जीवे मारण्याची धमकी

कार्यालयात फॉर्मल शूज बंधनकारक

सीबीआय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता जीन्स, टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज किंवा चप्पल घालून कार्यालयात येता येणार नाही.

असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. सीबीआयमधील पुरुष अधिकाऱ्यांना फॉर्मल शर्ट-पँट आणि फॉर्मल शूज बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच अधिकाऱ्यांना दाढी देखील वाढवता येणार नाही.

Sanjay Raut : ‘उद्धव ठाकरेंच्या सल्ल्याने खेडमध्ये आलोय, अजितदादा तुमच्या आमदारांना वेसण घाला’

महिलांसाठी साडी किंवा फॉर्मल शर्ट

सुबोधकुमार जयस्वाल यांनी मंजूरी दिलेल्या परिपत्रकामध्ये महिलांच्या गणवेशात देखील बदल केले आहेत.

महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्युटीवर येताना केवळ साडी किंवा फॉर्मल शर्ट परिधान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Lockdown च्या गोंधळावर अजित पवारांचे रोखठोक मत, म्हणाले – ‘सरकार कोणाचंही असलं तरी मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असतो’

आगामी काळात CBI मध्ये महत्त्वाचे बदल

1985 सालच्या बॅचचे IPS अधिकारी असलेल्या सुबोधकुमार जयस्वाल यांनी सीबीआयचे 33 वे संचालक म्हणून पदभार हाती घेतला आहे.

त्यांचा कार्यकाळ हा 2 वर्षांसाठी असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तीन सदस्यीय निवड समितीत जयस्वाल यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.

आगामी काळात CBI मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा त्यांचा मानस आहे.

IDBI Recruitment 2021 : आयडीबीआय बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, 1 कोटी रूपयांपर्यंतचं पॅकेज; जाणून घ्या प्रक्रिया