CBI नं GSTचे सहाय्यक आयुक्त दीपक पंडित यांच्याविरोधात दाखल केली FIR, बॉलिवूडमधील ‘या’ कुटुंबासोबत ‘कनेक्शन’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – केंद्रीय अन्वेशन विभागानं जीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे सहायक आयुक्त दीपक पंडित यांच्याविरोधात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती ठेवण्याप्रकरणी, भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली केस दाखल करण्यात आली आहे. पंडित यांच्याकडे जवळपास 4 कोटींची संपत्ती आहे, जी त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या स्रोतांच्या 376 पटीनं अधिक आहे. सीबीआयनं दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, पंडित यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. ही मालमत्ता जमवण्यासाठी त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. पंडित यांचं बॉलिवूड फिल्म मेकरच्या कुटुंबाशीदेखील खास कनेक्शन आहे.

दीपक पंडित फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक अशोक पंडित यांच्या जवळचे आहेत. अशोक यांनी 2018 मध्ये एक ट्विट केलं होतं. दीपक त्यांचे छोटे भाऊ असल्याचं अशोक यांनी म्हटलं होतं. तपास यंत्रणेनं दीपक पंडित, त्यांची पत्नी आरुषी, दोन मुलं आशुतोष आणि दिव्यांश यांच्या विरोधात केस दाखल केली आहे. तपास यंत्रणेनं सांगितलं की, तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दीपक पंडित यांच्या कुटुंबाच्या 7 विविध ठिकाणांवर छापेमारी केली जी सांयकाळी उशीरापर्यंत सुरू होती.

या 7 ठिकाणांपैकी 6 ठिकाणं मुंबईतील आहेत तर एक ठिकाणं भुवनेश्वरमधील आहे. सीबीआयनं सांगितलं की, पंडित यांनी 1985 मध्ये मुंबईच्या सीमाशुल्क विभागात लिपिक म्हणून सुरुवात केली होती. 2014 मध्ये त्यांची पदोन्नती झाली आणि ते सहायक आयुक्त बनले. सध्या ते भुवनेश्वर येथे तैनात आहेत.