6.76 कोटी रुपयांचे बनावट बिल बनविल्याप्रकरणी 4 नौदलाधिकाऱ्यांविरूद्ध FIR दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम नौदल कमांडला आयटी हार्डवेअर पुरविण्याच्या नावाखाली 6.76 कोटी रुपयांची बनावट बिले बनविण्याच्या आरोपाखाली नौदलाच्या चार अधिकाऱ्यांसह 14 जणांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, तपास यंत्रणेने कॅप्टन अतुल कुलकर्णी, कमांडर मंदार गोडबोले आणि आरपी शर्मा आणि पेटी ऑफिसर एलओजी (एफ अँड ए) कुलदीपसिंह बघेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 6.76 कोटी रुपयांची सात बनावट बिले केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीबीआय एफआयआरनुसार या सर्व नौदल अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर करून फसवणूक केली आणि सरकारी तिजोरी लुटली आणि आर्थिक लाभ घेतला. या संदर्भात सीबीआयनेही छापे टाकले होते, असे सूत्रांनी सांगितले.