विमान खरेदीत भ्रष्टाचार : CBI कडून हवाई दलाचे अधिकारी आणि स्विस कंपनीवर गुन्हा, UPA सरकारच्या काळात झाली होती ‘डील’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २००९ साली ट्रेनर विमान खरेदीत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी हवाई दल, संरक्षण दलातील अधिकारी आणि आर्म्स डिलर संजय भंडारी याच्यासह स्वीस कंपनीविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात विमान खरेदी व्यवहारात ३३९ कोटी रुपयांची लाच दिली गेली असल्याचा आरोप आहे.

https:// twitter.com/ANI/status/1142296838688649216

कोणाकोणावर गुन्हे ?

हवाई दलातील अधिकारी, संरक्षण दलातील अधिकारी, आर्म्स डिलर संजय भंडारी, स्वीस कंपनी पिलेट्स एअर क्राफ्ट लिमिटेड कंपनीचे अधिकारी यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत.

सीबीआयची छापेमारी

सीबीआयने शुक्रवारी भंडारी आणि इतर आरोपींच्या काही ठिकाणांवर ठापेमारी केली आहे. दिल्ली आणि इतर आसपासच्या परिसरात त्यांनी छापेमारी केली आहे. आर्म्स डिलर संजय भंडारी याचे दिल्लीतील पंचशील पार्कमध्ये कार्यालय आहे. त्याचेही नाव दाखल गुन्ह्यात आहे.

कशासाठी ट्रेनर विमान ?

‘ट्रेनर विमानांचा वापर हवाई दलात रुजु झालेल्या नवीन केडेट्सना विमान उड्डाण शिकविण्यासाठी वापरले जातात. भारतीय हवाई दलाने स्वदेशी एचटीपी-३२ या विमानात वारंवार काही त्रुटी येत असल्याने त्याचा वापर बंद केला होता. त्यानंतर स्वीस कंपनी पिलेट्स एअरक्राफ्ट लिमीटेड कडून ट्रेनर विमाने खरेदी करण्याचा मनमोहनसिंग यांच्या सरकारचा मानस होता. त्यांनी २ हजार ८९६ कोटी रुपयांनी ७५ विमाने खरेदी करण्याची डील केली होती.

आरोग्य विषयक वृत्त – 

 

मनाची एकाग्रता वाढवायची आहे का ? करा ‘हे’ उपाय

या खाद्यपदार्थांच्या सेवनाने तुम्ही दिवसभर राहू शकता आनंदी

हॉटेलमधील “फिंगर बाऊलमध्ये” हात धुणे चुकीचे हे आहेत त्याचे दुष्परिणाम

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे