अमिताभ गुप्तांची CBI चौकशी करा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी (व्हिडिओ)

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –   देशात कोरोनामुळे लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वर येथे जाण्यासाठी वाधवान कुटुंबियांना प्रवासासाठी परवानगीचे पत्र देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांची पुन्हा त्याच जागी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. सरकारच्या आशिर्वादाशिवाय ही गोष्ट शक्य होणार नसल्याचा आरोप करत अमिताभ गुप्ता यांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरु असताना सीबीआय आणि ईडीचे आरोप असलेल्या वाधवान बंधुंना महाबळेश्वर येथे जाण्यासाठी प्रवासा पास देणारे गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना पुन्हा एकदा त्याच जागेवर नियुक्त करण्यात आले आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारचा पास कोणताही अधिकारी आपल्या भरवश्यावर देऊ शकत नाही. जोपर्यंत सरकारमधील किंवा सरकार चालवणारे प्रमुख लोक आशिर्वाद देत नाही किंवा इशारा देत नाही तोपर्यंत ही गोष्ट घडणे शक्य नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. म्हणूनच अमिताभ गुप्ता यांनी क्लिनचिट मिळाल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे अमिताभ गुप्ता यांची सीबीआय चौकशीची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पत्र दिल्याची गुप्तांकडून कबूल

मागील महिन्यात देशात लॉकडाऊन असताना महाबळेश्वर येथे जाण्यासाठी वाधवान कुटुंबियांना परवानगीचं पत्र दिल्याचे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांनी कबूल केलं असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते. तोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. चौकशीमध्ये त्यांना क्लिनचिट मिळाली असून गुप्ता यांची पुन्हा त्याच जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like