सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI नं केलं ‘हे’ मोठं विधान, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूची चौकशी करत असलेल्या सीबीआयने एक निवेदन दिले आहे. सीबीआयने म्हटले आहे की तपास एजन्सी सुशांतच्या मृत्यूशी संबंधित व्यावसायिक अंगाने तपास करीत आहे. सीबीआयच्या प्रवक्त्याने निवेदन जारी केले की, ‘सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो व्यावसायिक अंगाने तपासणी करीत आहे आणि सर्व बाबींकडे लक्ष दिले जात आहे आणि आतापर्यंत कुठल्याही पैलूस नकार दिला गेला नाही.’

सात वर्षांपूर्वी ‘काई पो चे’ या चित्रपटापासून मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवणारे सुशांत (34) यावर्षी 14 जून रोजी मुंबईच्या वांद्रे येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळले होते. आता या प्रकरणात सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटूंबाचीही चौकशी केली जाईल. सुशांतची बहीण प्रियंका आणि मितू यांचीही चौकशी केली जाणार असून यापूर्वी देखील प्रियंका आणि मितूची चौकशी झाली आहे. यासह सुशांतचे मेहुणे आयपीएस ओपी सिंह याचीही चौकशी होऊ शकते. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण यांचीही सीबीआय टीमकडून चौकशी केली जाईल. ही सर्व चौकशी सीबीआयच्या टीममार्फत कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत केली जाईल.

खरं तर, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयला अद्याप खुनाचा पुरावा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत सीबीआय आता सुशांतने आत्महत्या केली असावी या बाजूने चौकशी करीत आहे. अशा परिस्थितीत सुशांतला आत्महत्येस कोणी प्रवृत्त केले याची आता सीबीआय चौकशी करेल.

या प्रकरणात जिथं रियाने पोलिसात एफआयआर दाखल केला आहे, तिथे सुशांतच्या कुटुंबीयांनी देखील एफआयआर दाखल केला आहे. अशा परिस्थितीत सुशांतचे कुटुंब आणि रिया यांची या प्रकरणात चौकशी होणे निश्चित आहे. रिया सध्या ड्रग्स प्रकरणात तुरूंगात आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला, तर रियाने देखील सुशांतच्या कुटूंबावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणात सीबीआयने प्रथम सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीची चौकशी केली. सिद्धार्थ पिठानीने सुशांतच्या कुटुंबियांवर रियाला फसवण्यासाठी वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. तसेच रियाने सुशांतच्या बहिणीवर औषध दिल्याचा आरोपही केला होता. यासह, अधिक माहिती म्हणजे बँक खात्यातही सुशांतची बहीणच नॉमिनी आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like