भ्रष्टाचार, हत्यारांच्या तस्करी प्रकरणी CBIचे १९ राज्यात ११० ठिकाणी छापे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय तपास एजन्सी सीबीआयने आज (मंगळवार) देशभरात एकाचवेळी ११० ठिकाणी छापे टाकले. हे छापे १९ राज्यातील एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी मारण्यात आले. दरम्यान सीबीआयने काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचार, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि शस्त्रांची तस्करी करणाऱ्या ३० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्रांची तस्करी होत असल्याची माहिती सीबीआयला मिळाली. देशाची सुरक्षा लक्षात घेऊन सीबीआयने आज विशेष मोहिम रबवून १९ राज्यामध्ये एकाच वेळी छापे टाकले. यासाठी सीबीआयने ११० ठिकाणे निश्चित केली होती. या कारवाईत आत्तापर्यंत सीबीआयला किती यश आले हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, या कारवाईमुळे भ्रष्टाचार आणि शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सीबीआयने मागील आठवड्यात देशभरातील बँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांवर छापे टाकले होते. ही कारवाई देखील विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली होती. यावेळी ६४० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील १४ जणांवर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने देशातील पुण्यासह देशातील १८ शहरामध्ये छापेमारी केली होती. १८ शहरातील ५० ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती.

सीबीआयने विशेष अभियान अंतर्गत दिल्ली, मुंबई, लुधियाना, ठाणे, वलसाड, पुणे, पलानी, गया, गुडगाव, चंदीगड, भोपाळ, सूरत आणि कोलार या शहरांमध्ये छापे टाकले. सीबीआयने टाकलेल्या छाप्यामध्ये कंपन्या, मोठे अधिकारी, बँक अधिकाऱ्यांचा समावेश असून सीबीआयने १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

 

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान