CBI Raid | राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्स येथे सीबीआयकडून चौकशी

जळगाव: पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन (NCP Former MP Ishwarlal Jain) यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्स (Rajmal Lakhichand Jewellers) येथे मंगळवारी (13 डिसेंबर) सीबीआयने (CBI Raid) छापा टाकला. यावेळी सीबीआयकडून (CBI Raid) चौकशी करण्यात आली. या छापेमारीची अधिकाऱ्यांकडून मोठी गोपनियता बाळगण्यात आली आहे. तब्बल बारा तासानंतर चौकशी संपल्यावर अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे हस्तगत केल्याचे समजते.

मंगळवारी 20 ते 25 अधिकाऱ्यांचे सीबीआय पथक जळगावच्या सराफ बाजारात दाखल झाले. यावेळी राजमल लखीचंद ज्वेलर्स येथे सीबीआयने (CBI Raid) सकाळी 7 वाजल्यापासून चौकशी सुरू केली. तब्बल बारा तासांनी सायंकाळी 7 वाजता ही चौकशी संपली. या चौकशीत अधिकाऱ्यांनी अनेक कागदपत्रे हस्तगत केली आहेत.

दिल्लीतून आलेल्या सीबीआयच्या पथकाने जळगाव, नाशिक आणि ठाणे येथील आस्थापना आणि घरांवर छापे टाकले. यात सुमारे 20 ते 25 जणांच्या पथकाने आरएल समूहाच्या (RL Group) जळगावातील आर. एल. ज्वेलर्स, नाशिक येथील ज्वेलर्सचे शोरुम, मानराज आणि नेक्सा या वाहनांच्या शोरूमसह जळगावातील राहते घर आणि ठाणे येथील फ्लॅटवर एकाच वेळी छापा टाकला. या ठिकाणाहून पथकाने बँकेसह व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांच्या प्रती ताब्यात घेतल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या आरएल समूहाच्या राज्यभरात विविध शाखा आहेत.
यासाठी त्यांनी स्टेट बँकेकडून (SBI) 525 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. परंतु त्यांनी कर्जाचे हफ्ते फेडले नाहीत.
त्यामुळे हा छापा पडल्याची माहिती आहे. या कर्जासाठी बँकेकडे गहाण ठेवलेल्या मालमत्ता बँकेकडून विक्री
करण्यात आल्या होत्या. तरी देखील पूर्ण कर्जफेड झाली नाही. याप्रकरणी बँक आणि आरएल समुहामध्ये वाद सुरू आहेत.

सेटलमेंटसाठी आर एल समूहाकडून बँकेला प्रस्ताव देण्यात आला आहे.
यासाठी साक्षीदारांच्या सह्या लागणार असल्याची अट बँकेने घातली.
मात्र, जैन यांचा मुलगा अमरीष जैन विभक्त राहत असल्याने तो सही देण्यास तयार नव्हता.
त्यामुळे हे प्रकरण मार्गी लागत नसल्याने स्टेट बँकेने सीबीआयकडे तक्रार केली होती.

Web Title :- CBI Raid | cbi team raids at rajmal lakhichand jewellers in jalgaon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, तर…; संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल

Pandharpur Accident | पंढरपुर भीषण अपघात : ट्रॅक्टर उजनी कालव्यात कोसळून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू, मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश