CBI Raid In Bank Fraud Case | पुण्यातील बड्या उद्योगपतीशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयच्या टीमकडून छापे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CBI Raid In Bank Fraud Case | आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने (CBI) छापेमारीस सुरूवात केली आहे. नामांकीत बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Builder Avinash Bhosale) यांच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली आहे (CBI Raid In Bank Fraud Case). मागील अनेक दिवसांपासून अविनाश भोसले हे ईडीच्या (ED) रडारवरही आहेत. (CBI Raids On Builder Avinash Bhosale’s Property)

अविनाश भोसले यांचा मुंबई आणि पुण्यात त्यांचा बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. तसेच, ते हॉटेल व्यावसायिक आहेत. पुण्यातच त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय देखील आहे. मागील वर्षी ईडीकडून कारवाई करत अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबाची सुमारे 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. दरम्यान, सध्या सीबीआयने अविनाश भोसले यांच्या मालमत्तांवर छापेमारी केली असल्याची माहिती पसरली आहे.

 

Web Title :- CBI Raid In Bank Fraud Case Builder avinash bhosale Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा