पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – CBI Raid On IAS Dr. Anil Ramod | केंद्रीय अन्वेषण विभागाच्या Central Bureau of Investigation (CBI) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Division Of CBI) अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड (Additional Divisional Commissioner Dr. Anil Ramod) याला ८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले (Pune Bribe Case). त्याच्या निवासस्थानी टाकलेल्या धाडीमध्ये 6 कोटींची कॅश आणि 14 स्थावर मालमत्तेची कागदपत्रे आढळून आले. राज्य शासनाच्या अखत्यारी असलेल्या महसूल अधिकार्यावर साधारणपणे राज्य शासनाचा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (Anti Corruption Bureau Maharashtra (ACB Maharashtra) कारवाई करते. पण, या प्रकरणात सीबीआयने कशी कारवाई केली, असा प्रश्न अनेकांना पडला. त्यात अनिल रामोड हा राज्य शासनाच्या अखत्यारीत असला तरी त्याच्याकडे महसूल लवाद (Arbitrator for Pune, Satara & Solapur Districts for NHAI) म्हणून काम आहे (CBI Raid On IAS Dr. Anil Ramod). दरम्यान, डॉ. रामोड याला शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला दि. 13 जून पर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून वेगवेगळ्या प्रकल्पासाठी भूसंपादन केले जाते. त्यामध्ये काही वाद असला तर त्यावर लवादामध्ये सुनावणी होऊन तोडगा काढला जातो. राष्ट्रीय महामार्गाच्या National Highways Authority of India (NHAI) कामासाठी होणार्या पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील भू संपादनाच्या कामातील लवाद म्हणून काम पाहण्याची जबाबदारी अनिल रामोड याच्याकडे आहे. राष्ट्रीय महामार्ग कायद्यानुसार लवाद म्हणून तो काम पहात होता. (CBI Raid On IAS Dr. Anil Ramod)
तक्रारदार यांनी भू संपादनात अधिकची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी या लवादाकडे अर्ज केला होता. तो अनिल रामोड प्रलंबित ठेवत होता.
तक्रारदार यांनी त्याची भेट घेतल्यावर त्याने नुकसान भरपाईच्या १० टक्के लाच मागितली. तक्रारदार यांनी सीबीआयकडे तक्रार केली.
त्यानंतर रामोड याने तडजोड करुन ८ लाख रुपये स्वीकारण्याचे कबुल केले. त्यानंतर शुक्रवारी सापळा रचून त्याला सीबीआयने पकडले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे केंद्र सरकारचे असल्याने व त्यानुसार लवाद म्हणून अनिल रामोड हा काम पहात असल्याने
सीबीआयने त्याच्यावर कारवाई केली. दरम्यान, डॉ. रामोड याला शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.
त्याला दि. 13 जून पर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
Web Title : CBI Raid On IAS Dr. Anil Ramod | Additional Divisional Commissioner Dr. Anil Ramod in CBI custody till June 13
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विश्रामबाग पोलिस स्टेशन – भाड्याने लॅपटॉप घेऊन 40 लाखाची फसवणूक
- G 20 Summit Pune | जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरीचे आयोजन
- G 20 Summit Pune | जी 20 शिक्षण कार्यगटाच्या पुण्यात होणाऱ्या बैठकीनिमित्त 15 जून रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळा