IAS अधिकार्‍याच्या घरावर CBIचा ‘छापा’, नोटा मोजण्यासाठी मागवली ‘मशीन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका अधिकाऱ्याच्या घरावर सीबीआयने छापा टाकल्यानंतर लपवलेल्या नोटा मोजण्यासाठी थेट नोटा मोजण्याचे मशीनच मागवावे लागले. ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथील बुलंदशहरमधील डीेएम आयएएस अभय सिंह यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला, हा छापा खनन घोटाळ्यातील प्रकरणानिमित्त टाकण्यात आला.

पैसे मोजण्यासाठी आणावी लागली मशीन
अभय सिंह हे फतेहपूरचे डीेएम होते, या दरम्यान त्यांच्यावर अवैधपणे खनन करण्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी सीबीआय तपासणी करत आहे. या छापेमारी दरम्यान सीबीआयने त्यांच्या घरातून एवढ्या नोटा मिळाल्या की त्या मोजण्यासाठी सीबीआयला एक नोटा मोजणारी मशीन आणावी लागली.
सीबीआयने सकाळ डीएम अभय सिंह यांच्या घरावर आणि ऑफिसमध्ये छापे टाकले, यात त्यांनी जवळपास २ तास त्यांची चौकशी केली आणि त्यांचा घराची तपासणी करण्यात आली.

घरात नोटांचे बंडल
या तपासणी दरम्यान सीबीआयला नोटांचे बंडलच्या बंडल मिळाले. या नोटांचे बंडल मोजण्यासाठी सीबीआयला नोटा मोजणारी मशीन मागववी लागली. अंदाज बांधण्यात येत आहे की आयएएसच्या घरातून बरीच कॅश जप्त करण्यात आली आहे. अभय सिंह समाजवादी पार्टीच्या काळात अखिलेश यादव यांच्या सरकारच्या काळात फतेहपूर मध्ये डीएम होते. या दरम्यान त्यांनी बेकायदा पद्धतीने खनन पट्यात खनन केले होते. उच्च न्यायालयाच्या विरोधानंतर, लोकांच्या विरोधानंतर देखील अवैधपणे खनन करण्यात आले. ते प्रतापगढचे मूळ रहिवासी आहेत. त्यांना जवळपास ५ महिन्यांपुर्वी बुलंदशहरचे डीएम बनवण्यात आले होते.

इतर शहरात देखील छापेमारी
बुलंदशहराशिवाय उत्तर प्रदेशच्या लखनऊ, हमीरपूर आणि फतेहपूरमध्ये देखील सीबीआयने छापेमारी केली आहे. सांगण्यात येत आहे की ही कारवाई दिवसभर सुरु होती. लखनऊचे आयएएसच्या घरात देखील छापेमारी सुरु आहे. विवेक कुमार यांच्यावर देवरियाचे डीएम असताना खनन पट्यात घोटाळ्याचा आरोप आहे. याशिवाय त्यांच्या सुशात सिटी गोल्फ सिटीतील घरावर देखील छापेमारी सुरु आहे.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

You might also like