home page top 1

सातारा : 3000 रुपयांची लाच घेताना रेल्वे अधिकारी पुणे CBI च्या जाळ्यात

सातारा : पोलसनामा ऑनलाइन –  रेलरोकोमध्ये अटक करण्यात आलेल्या संशयिताची कागदपत्रे परत देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्विकारता क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशनमधील उपनिरक्षकाला पुणे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. एम.आय. बागवान असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. या कारवाईनंतर अधिकाऱ्यांनी बागवान याच्या कोल्हापूरातील घरावर टाकला. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक एम.आय. बागवान हा मागील दोन वर्षापासून कर्यरत होता. काही महिन्यांपूर्वी एका संघटनेने रेलरोको केला होता. त्यावेळी बागवान याने आदोलकाना अटक केली होती. अटक केलेल्या व्यक्तीकडून पॅनकार्ड आणि अन्य महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली होती. जप्त केलेली कागदपत्र देण्यासाठी बागवान याने तक्ररादाराकडे तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने पुणे सीबीआय यांच्याकडे तक्रार दाखल केली.

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार सीबीआयच्या पथकाने बुधवारी (दि.18) सायंकाळी पाचच्या सुमारास क्षेत्र माहुली येथील रेल्वे कार्यालयात सापळा रचून बागवान याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर सीबीआय अधिकाऱ्यांनी तो रहात असलेल्या शासकीय वसाहतीमधील घराची झडती घेतली. बागवान मुळचा कोल्हापूरचा रहिवाशी असून त्याच्या कोल्हापूरमधील घराची देखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. मात्र, झडतीमध्ये काहीही सापडले नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Loading...
You might also like