CBI Recruitment : ‘या’ पध्दतीनं सीबीआयमध्ये थेट भरती; जाणून घ्या पात्रता, निवड प्रक्रिया आणि सॅलरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न असंख्य तरूणांचे असते. सीबीआय ऑफिसर म्हणून काम करणे आणि करियर बनवण्यासाठी लाखो तरूण दरवर्षी स्पर्धा परीक्षेला बसतात. सीबीआयमध्ये सामान्यपणे पदोन्नती किंवा प्रतिनियुक्तीच्या आधारावर काम करण्याची संधी मिळते, परंतु देशाच्या या प्रमुख तपास एजन्सीमध्ये थेट भारतीद्वारे सुद्धा नोकरी मिळण्याची संधी दिली जाते. सीबीआयमध्ये थेट भरती प्रक्रियेद्वारे निर्धारित प्रात्रता मानदंड पूर्ण करणारे उमेदवार सुद्धा सीबीआयमध्ये सरकारी नोकरी मिळवू शकतात.

सीबीआयमध्ये थेट भरतीचा पर्याय
केंद्रीय अन्वेषण विभागात थेट भरतीचा प्रमुख पर्याय आहे उप-निरीक्षक म्हणून भरती होणे. भारत सरकारच्या कार्मिक, तक्रार निवारण आणि पेन्शन मंत्रालयाच्या अंतर्गत सीबीआयमध्ये उप-निरीक्षक पदावर भरती कर्मचारी निवड आयोगाद्वारे (एसएससी) आयोजित करण्यात येणार्‍या संयुक्त पदवी स्तरीय (सीजीएल) परीक्षेच्या माध्यमातून केली जाते. एसएससीद्वारे सीजीएल परीक्षेचे आयोजन दरवर्षी केले जाते. सीजीएल परीक्षेच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि विभागांमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांची निवड केली जाते. याच पदांवर ग्रुप बी स्तराचे पद सीबीआयमध्ये उप-निरीक्षकाचे सुद्धा एक पद आहे.

सीबीआयमध्ये सब-इन्स्पेक्टरच्या थेट भरतीसाठी आयोजित केल्या जाणार्‍या एसएससी सीजीएल परीक्षेत तेच उमेदवार सहभागी होऊ शकतात, ज्यांनी एखाद्या मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण केली असेल. सोबतच, उमेदवाराचे वय परीक्षेच्या वर्षी कट-ऑफ डेटमध्ये 30 वर्षापेक्षा जास्त असू नये. 2020 च्या एसएससी सीजीएल परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे, ज्यासाठी कट-ऑफ डेट 1 जानेवारी 2021 ठेवण्यात आली आहे.

एसएससी सीजीएल 2020 परीक्षेसाठी अर्जाची (अंतिम तारीख 31 जानेवारी 2021) अधिक माहिती येथून घ्या. https://www.jagran.com/news/job-ssc-cgl-notification-2020-released-for-6506-vacancies-in-central-ministries-and-departments-apply-online-at-ssc-nic-in-by-january-312021-21215993.html

तर, आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना कमाल वयात सूट दिली जाते, ओबीसीसाठी 3 वर्ष, एससी, एसटीसाठी 5 वर्ष, दिव्यांगांसाठी 10 वर्ष.

सीबीआयमध्ये सब-इन्स्पेक्टरच्या थेट भरतीसाठी निवड प्रक्रिया
सीबीआयमध्ये सब-इन्स्पेक्टरच्या थेट भरतीसाठी होणार्‍या सीजीएल परीक्षेत चार टप्पे असतात. – टियर 1, टियर 2, टियर 3 आणि टियर 4. पहिल्या टप्पयाच्या टियर 1 आणि टियर 2 परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान आणि तर्कशास्त्र, सामान्य माहिती, परिमाणात्मक अभिरूची, इंग्रजी, सांख्यिकी इत्यादी विषयातील प्रश्न विचारले जातात. या टप्प्यात यशस्वी उमेदवारांना टियर 3 लेखी परीक्षेत सहभागी व्हावे लागते, ज्यामध्ये उमेदवारांना सविस्तर उत्तरांसह प्रश्न सोडवायचे असतात. यानंतर अंतिम टप्पा टियर 4 एक कम्प्यूटर प्राविण्य परीक्षा / डाटा एंट्री कौशल्य परीक्षा होते. सीजीएल परीक्षेसाठी विविध टप्प्यांसाठी ठरलेल्या सिलॅबसची माहिती अधिसूचनेतून घेता येते. तर, सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी घोषित उमेदवारांची यादी आयोगाद्वारे संबंधीत विभागांच्या नियुक्तीसाठी पाठवली जाते.

सीबीआय सब-इन्स्पेक्टरची सॅलरी
सीबीआयमध्ये सब-इन्स्पेक्टरची नियुक्ती ग्रुप बी स्तरवर केली जाते, ज्यावर काम करताना 7 व्या वेतन आयोगाच्या पे-मॅट्रिक्स लेव्हल 7 (44,900 ते 1,42,400 रुपये) नुसार प्रति महिना सॅलरी दिली जाते. याशिवाय अनेक अन्य मासिक भत्ते आणि सुविधा सुद्धा दिल्या जातात.