सुप्रीम कोर्टातील वकिल इंदिरा जयसिंह आणि आनंद ग्रोवर यांच्या घर, कार्यालयावर CBIचा छापा

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील सुप्रसिध्द ज्येष्ठ वकिल इंदिरा जयसिंह आणि आनंद ग्रोवर यांच्या मुंबई आणि दिल्‍ली येथील घर आणि कार्यालयावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरूवारी छापे टाकले. हे छापे त्यांच्या लॉयर्स कलेक्टिव फाऊंडेशनमध्ये परदेशातून फंडिग येत असल्याच्या संदर्भात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा देखील दाखल केल्यानंतर मुंबई आणि दिल्‍ली येथे छापे टाकले. लॉयर्स कलेक्टिव फाऊंडेशनवर एफसीआरए या कायद्याचं उल्‍लंघन केल्याचा आरोप आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने फाऊंडेशनचा परवाना देखील रद्द केलेला आहे.

फाऊंडेशनने एफसीआरएच्या नियमांचं उल्‍लंघन केल्याचे लक्षात आल्यानंतर सीबीआयने आनंद ग्रोवर आणि लॉयर्स कलेक्टिव फाऊंडेशनवर गुन्हा दाखल केला. छापेमारी दरम्यान आनंद ग्रोवर यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनी यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. दरम्यान, त्यांनी सीबीआयकडून लावण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. गृहमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार परदेशातून काही रक्‍कम जमा करण्यात येत होती आणि त्याचा वापर एचआयव्ही/एड्स बिलाची बाजू प्रसारमाध्यमांना सांगण्याकरिता करण्यात येत होती.

यामागे लॉयर्स कलेक्टिव फाऊंडशेनचे नाव समोर आले आहे. एका फ्री-ट्रेड एग्रिमेंट रॅलीचं देखील ग्रोवर यांच्या सामाजिक संस्थेने आयोजन केले होते आणि त्यांनीच कायदा मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन केले होते. ते एफसीआरए कायद्याचं उल्‍लंघन आहे.

कोण आहेत इंदिरा जयसिंह आणि आनंद ग्रोवर

इंदिरा जयसिंह आणि आनंद ग्रोवर हे वरिष्ठ वकिल असून ते सर्वोच्च (सुप्रीम) न्यायालयात वकिली करतात. इंदिरा जयसिंह या सन 2009 ते सन 2014 दरम्यान युपीए सरकारच्या काळात एडिशनल सॉलिसिटर जनरल म्हणून कार्यरत होत्या. त्यावेळी त्यांच्यावर पदाचा दुरूपयोग करून कायद्याच उल्‍लंघन केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर लावण्यात आला होता.

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

Loading...
You might also like