मोठ्या घोटाळ्या प्रकरणी ‘त्या’ माजी पोलीस आयुक्तांना कोणत्याही क्षणी अटक

वृत्तसंस्था : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार सीबीआयने लुकआउट नोटीस जारी केली आहे. शारदा चिट फंड गैरव्यवहाराच्या प्रकरणात पुरावे लपवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सीबीआय राजीव कुमार यांच्या घरी पोहचली आहे.  ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

राजीव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दिलेल्या संरक्षणाची मुदत शुक्रवारी 24 मे रोजी संपली आहे. राजीवकुमार यांनी ही मुदत वाढवून मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती. मात्र न्यायालयाने त्यास नकार दिल्याने त्यांना सीबीआय कोणत्याही क्षणी अटक करू शकते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना याबाबत कोलकाता उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. मात्र सध्या पश्चिम बंगालमध्ये वकिलांचा संप सुरू असल्याने ते कोलकाता उच्च न्यायालयातही दाद मागू शकत नाहीत. सीबीआयने कुमार यांच्या अटकेसाठी त्यांच्या उत्तर प्रदेशातल्या घरी पोलीस तैनात केले आहेत.

दरम्यान, लुकआउट नोटीस जारी केल्याने राजीव कुमार यांना देशाबाहेर जाता येणार नाही. कोणत्याही विमानतळावर राजीवकुमार यांना जाता येणार नाही.  लुकआउटची ही नोटीस एक वर्षभरासाठी लागू असणार आहे. सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाला राजीव कुमार यांच्यावरील आरोपांबाबत माहिती दिली आहे. त्यात शारदा चिट फंड घोटाळ्याच्या तपासादरम्यान कुमार यांनी सीडीआरसह इतर पुरावे नष्ट केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

याआधी, राजीवकुमार यांच्या वरून पश्चिम बंगाल पोलीस आणि सीबीआयचे पोलीस यांच्यात खडाजंगी झाली होती.

Loading...
You might also like