CBI vs CBI : कोर्टानं सीबीआयला फटकारलं, विचारलं – ‘माजी स्पेशल डायरेक्टर राकेश अस्थानांची ‘लाई डिटेक्टर टेस्ट’ का नाही केली ?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CBI विरुद्ध CBI भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणी बुधवारी राउज एवेन्यू न्यायालयात सुनावणी झाली. न्यायलयाने यावेळी तपास यंत्रणांना देखील फटकारले. न्यायालयाने सीबीआयला विचारले की चौकशीदरम्यान सीबीआयचे माजी स्पेशल डायरेक्टर राकेश अस्थाना यांची लाय डिटेक्टर टेस्ट का करण्यात आली नाही. विशेष न्यायालयाने सीबीआयला प्रकरणाच्या संबंधात केस डायरी आणण्यास सांगितले. आज या प्रकरणावर 28 फेब्रुवारीला सुनावणी झाली.

सुनावणी दरम्यान न्यायालयाने विचारले प्रश्न –
सुनावणी दरम्यान स्पेशल सीबीआय न्यायाधीश संजीव अग्रवाल सीबीआयच्या तपासावर चौकशी करण्यात आली. न्यायलायाने सीबीआयला विचारले की राकेश अस्थाना यांच्यावर तपासादरम्यान असत्य जाणून घेण्यासाठी टेस्ट किंवा सायकोलॉजिकल टेस्ट का करण्यात आली नाही ?
न्यायालयाने प्रश्न केला की सीबीआयने राकेश अस्थाना यांना दुसऱ्या आरोपींसह समोरासमोर बसून चौकशी का केली नाही ?
न्यायालयाने विचारले की राकेश अस्थाना यांच्या चौकशीदरम्यान मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक सामान काढून घेण्यात आले होते का ?

सीबीआयने तीन प्रश्नांच्या उत्तरात सांगितले की आम्ही राकेश अस्थाना यांची फक्त चौकशी केली. न्यायालयाने केसची डायरी घेतली, न्यायालयाने सांगितले की आम्ही तपशीलवार अभ्यास करु की तुम्ही कशा प्रकारे तपास केला आहे.

न्यायालयाने सांगितले केस संबंधित सर्व लोकांचे संपर्क क्रमांक –
न्यायालयाने सीबीआयकडे या केस संबंधित महत्वाचे कॉल डिटेल मागितले आहेत. आता सीबाआयला केस संबंधित लोकांचे 15 ऑक्टोबर 2018 ते 23 ऑक्टोबर 2018 पर्यंतचे कॉल डिटेल द्यावा लागतील. यापूर्वी सीबीआयने न्यायालयाला केस डायरी दिली आणि सांगितले की यात पैशांच्या व्यवहाराचे रेकॉर्ड आहेत.

न्यायालयाने सीबीआयला विचारले की तुम्ही या प्रकरणाकडे PMLA केस प्रमाणे पाहत आहात ? सोमेश प्रसाद यांचे दोन मोबाईल फोन तुम्ही घेतले होते ? सोमेश प्रसाद याने त्याचा ईमेल तुमच्या देखील ओपन केला ? यावर सीबीआयने न्यायालयाला सांगितले की त्याने ईमेल ओपन केला नाही. दोन्ही फोन देखील दिले नाहीत. आम्ही नोटीस पाठवली आहे. यावर न्यायालयाने सांगितले की सोमेश प्रसाद यांच्याकडून बरंच काही समोर येऊ शकतं होते, परंतु आता सर्व संपले आहे.

सीबीआयचे माजी स्पेशल डायरेक्टर राकेश अस्थाना यांच्या भ्रष्टचार प्रकरणातील चौकशीवर नाराजी व्यक्त केली होती. अस्थाना आणि डीएसपी देवेंद्र कुमार यांना 2018 साली ताब्यात घेण्यात आले होते. परंतु त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. दोघांविरोधात पुरेसे पुरावा उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याचे नाव चार्जशीटच्या कॉलम 12 मध्ये लिहिली गेले होते.