SSR Case : CBI नं मनोज शशिधर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केली SIT, FIR दाखल केल्यानंतर तपास सुरू

नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात सीबीआयने औपचारिक पद्धतीने एफआयआर दाखल केला आहे. सीबीआयने या प्रकरणात एक एसआयटी स्थापन केली आहे. गुजरात कॅडरचे आयपीएस मनोज शशिधर हे एसआयटीचे प्रमुख आहेत. गुजरात कॅडरच्या महिला आयपीएस अधिकारी गगनदीप गंभीर यांचासुद्धा या टीममध्ये समावेश आहे. ज्या दिल्ली येथील सीबीआय मुख्यालयात कार्यरत आहेत.

या प्रकरणात सीबीआयची टीम लवकरच लोकेशनवर सर्च ऑपरेशन सुरू करू शकते. यासोबतच फॉरेन्सीक पुरावे जमवण्यासह सीएफएसएल लॅबमध्ये तपासणीनंतर एसआयटी पुढील कारवाई करेल. या प्रकरणात सर्व पुरावे तातडीने जमवणे खुप जरूरी आहे. कारण सीबीआयच्या तपासाच्या रिपोर्टवर आधारित ईडीचा तपास अवलंबून आहे. ईडीचा पुढील तपास सीबीआयच्या अनेक महत्वपूर्ण इनपुट्सवर अधारित असणार आहे. कारण सीबीआय आणि ईडी दोन्ही तपास यंत्रणांची काम करण्याची पद्धत आणि वैशिष्ट्य वेगवेगळे आहे.

या प्रकरणाचा तपास करणार्‍या सीबीआय टीमचे नेतृत्व आयपीएस अधिकारी मनोज शशिधर करत आहेत. या टीममध्ये तीन प्रमुख तपास अधिकारी असून त्यांची माहित घेणे खुप आवश्यक आहे, त्यांची माहिती अशी आहे…

1994 बॅचचे मनोज शशिधर गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत आणि सीबीआयमध्ये सध्या संयुक्त संचालक पदावर कार्यरत आहेत. गुजरातमध्ये मनोज शशिधर हे राज्य गुप्तवार्ता विभागात अ‍ॅडिशनल डीजी पदावर सुद्धा कार्यरत होते, यासोबतच गुजरातच्या वडोदराचे कमिश्नर म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. तसेच इतरही महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यात सीबीआयमध्ये मनोज शशिधर संयुक्त संचालक पदावर कार्यरत झाले होते. सीबीआयमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ त्यांना मिळाला आहे. आता सुशांत प्रकरणाचा तपास करणार्‍या टीमचे ते नेतृत्व करतील

कोण आहेत गगनदीप गंभीर?
2004 बॅच आणि गुजरात कॅडरच्या आयपीएस अधिकारी गगनदीप गंभीर सीबीआयच्या डॅशिंग अधिकारी आहेत. मागील काही वर्षांदरम्यान सीबीआयमध्ये गगनदीप यांच्या नेतृत्वात अनेक महत्वाच्या प्रकरणांचा तपास झाला आहे. अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांचा तपास करणार्‍या एसआयटीमध्ये त्यांनी खुप चांगले काम केले आहे. उत्तरप्रदेशात अवैध मायनिंग आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव प्रकरण, ऑगस्टा वेस्टलँड डील प्रकरण, विजय माल्या प्रकरण, बिहारचा सृजन घोटाळा, इत्यादी प्रकरणात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. एसआयटीत जेव्हा जॉईंट डायरेक्टर साई मनोहर नेतृत्व करत होते, तेव्हा गगनदीप टीममध्ये सहभागी झाल्या होत्या. राकेश अस्थाना आणि आलोक वर्मा प्रकरणानंतर राकेश अस्थानासंबंधी प्रकरणाची जबाबदारी गगनदीप यांना दिली होती.

केंद्राने बुधवारी दिली सीबीआय तपासाला मंजूरी
केंद्राने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा सीबीआयकडून तपास करण्याच्या बिहार सरकारच्या शिफारसीला मंजूरी दिली. तर सर्वोच्च न्यायालयाने सुशांतला प्रतिभावंत कलाकार संबोधले. न्यायालयाने म्हटले की, त्याच्या मृत्यूचे सत्य समोर आले पाहिजे. 34 वर्षांच्या सुशांतचा 14 जूनला मुंबईत मृत्यू झाला होता. यानंतर प्रकरणाने राजकीय रूप घेतले. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीला सीबीआय तपासाचे पाऊल मान्य नव्हते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी बिहारच्या याचिकेवर न्यायअधिकाराचा मुद्दा उपस्थित केला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like