CBSE च्या दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; सुधारीत वेळापत्रक जाहीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वी परीक्षेच्या वेळापत्रकात थोडासा बदल करण्यात आला आहे. बोर्डाने काही विषयांच्या परीक्षेच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. CBSE ने आपल्या वेबसाईट cbsc.gov.in यावर परीक्षेचे नवीन वेळापत्रक दिले आहे. नव्या वेळापत्रकानुसार बारावीची फिजिक्सची परीक्षा 8 जून रोजी होणार आहे. यापूर्वी ती 13 मे रोजी होणार होती. तर मॅथ्सचा पेपर 31 मेला होईल. जो पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 1 जून रोजी होता. तर बारावीचा ज्योग्राफीचा पेपर आता 3 रोजी होईल. जो पूर्वी 2 जून रोजी होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता नव्या वेळापत्रकानुसार परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.

सीबीएसई बोर्डाच्या पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 13 आणि 14 मे रोजी काही विषयांच्या परीक्षा होणार होत्या. परंतु आता या दान्ही तारखांना कोणत्याही विषयाची परीक्षा होणार नाही.सीबीएसई 12 वीची परीक्षा 11 जून 2021 रोजी संपणार आहे. यापूर्वी शेवटचा पेपर 14 जून 2021 रोजी होणार होता. तर सीबीएसईच्या 10 वीचा सायन्सचा पेपर 21 मे रोजी होणार आहे. तर या तारखेला 10 वी मॅथ्सचा पेपर होणार होता. आता मॅथ्सचा पेपर 2 जून रोजी होईल. त्याशिवाय 10 वीचा फ्रेंच, जर्मन, अरबी, संस्कृत, मलायलम, पंजाबी, रशियन आणि उर्दू आदी विषयांच्या परीक्षेच्या तारखाही बदलल्या आहेत. 10 वी बोर्डाच्या परीक्षा सुरू आणि संपण्याच्या तारखा बदलल्या नाहीत. दहावीचा पहिला पेपर 4 मे ला सुरु होणार असून शेवटचा पेपर 11 जूनला होईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.