CBSE 10 वी चा निकाल आज नाही तर ‘या’ तारखेला लागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CBSE बोर्डाच्या इयत्ता 12 वी चा निकाल सोमवारी (दि.13) जाहीर झाला. त्यामुळे दहावीचा निकाल आज (मंगळवार) लागणार असल्याची चर्चा होती. मात्र, CBSE च्या बोर्डाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दहावीचा निकाल लागणार नसून 10 वीचा निकाल 15 जुलै रोजी लागण्याची शक्यता असल्याचे सांगितले. परंतु बोर्डाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी देखील 15 जुलै रोजी दहावीचा निकाल लागेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

CBSE बोर्डाच्या 10 वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल cbse.nic, www.results.nic.in किंवा www.cbseresults.nic.in यापैकी कोणत्याही संकेत स्थळावर पहाता येणार आहे. या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला सीट नंबर टाकून माहिती अपलोड करायची आहे. माहिती अपलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ऑनलाईन स्वरुपात असणार आहे. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

यंदा देशभरात तब्बल 18 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यापूर्वी 13 जुलै रोजी 12 वीचा निकाल जाहीर झाला होता. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यामध्ये निकालाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आज दहावीचा निकाल लागणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता दहावीचा निकाल आज लागणार नसल्याचे वृत्त एका हिंदी वृत्तपत्राने दिलं आहे.