CBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला? वाचा डिटेल्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सीबीएसईची 12वीची परीक्षा रद्द झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना त्यांच्या रिझल्टची उत्कंठा लागली आहे. विद्यार्थ्यांना हेदेखील जाणून घ्यायचे आहे की, सीबीएसई 12वीच्या रिझल्ट (CBSE 12th Class Result 2021) कोणत्या आधारावर तयार केला जाईल. तर मीडिया रिपोर्टनुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) 12वीच्या विद्यार्थ्यांचे 10वी, 11वीच्या फायनल परीक्षेचे मार्क्स आणि 12वीच्या प्री बोर्डच्या मार्क्सच्या (CBSE 12th Class Result 2021)आधारावर निकाल तयार करू शकते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

 

13-सदस्यीय कमिटी 30:30:40 फॉर्म्युल्याच्या बाजूने (30:30:40 Formula)

सीबीएसईने नियुक्त केलेली 13-सदस्यीय कमिटी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या इव्हॅल्यूएशन क्रायटेरियाची शिफारस करण्यासाठी 30:30:40 फॉर्म्युलाच्या (30:30:40 Formula) बाजूने आहे.
म्हणजे 10वी आणि 11वी इयत्तेच्या फायनल रिझल्टला 30% वेटेज दिले जाईल आणि 12वी इयत्तेच्या प्री बोर्ड एग्झामला 40% वेटेज दिले जाईल.

कमिटी 17 जूनला मार्किंग फॉर्म्युला (Marking formula) करू शकते घोषित

कमितटीने मार्किंग फॉर्म्युला (Marking formula) 17 जून 2021 ला सुप्रीम कोर्टात सादर केल्यानंतर घोषित करण्याची शक्यता आहे.
मागील महिन्यात पालकांनी सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये महामारीमुळे सीबीएसईची बारावीची परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती.
तर सीबीएसईने सर्वप्रथम 1 जूनला बारावीची परीक्षा रद्द केली होती.
यानंतर अनेक राज्याच्या बोर्डांनी सुद्धा आपली परीक्षा रद्द केली.

10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी वेबिनार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

 

शाळांना प्रॅक्टिकल टेस्ट ऑनलाइन आयोजित करण्याचे निर्देश

अनेक शाळांच्या प्रिन्सिपलने कमिटीला ही माहिती दिली आहे.
की, ते अकॅडमिक ईयर 2020-21 च्या दरम्यान शाळांमध्ये आयोजित केलेल्या टेस्ट आणि एग्झामच्या आधारावर विद्यार्थ्यांची मार्किंग करण्याच्या स्थितीत आहेत.
ज्या शाळांमध्ये प्रॅक्टिकल टेस्ट आयोजित करता येऊ शकल्या नाहीत.
त्यांना ऑनलाइन प्रॅक्टिकल टेस्ट आणि ओरल आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बारावीचे इंटरनल असेसमेंटचे मार्क्स 28 जूनपर्यंत सीबीएसई सिस्टमवर अपलोड केले जाणार आहेत.

मूल्यांकनाबाबत आहे वेगवेगळे मत

तर काही प्रिन्सिपलचे म्हणणे आहे की, बारावीच्या पीरियोडिक टेस्ट, प्री-बोर्ड मार्क्स आणि इंटरनल असेसमेंटला जास्त वेटेज दिले गेले पाहिजे.
एका प्रिन्सिपलने म्हटले, अकरावीच्या मार्कांचा समावेश करणे योग्य ठरणार नाही कारण विद्यार्थी अकरावीच्या वर्गाला गांभीर्याने घेत नाहीत.
मुंबईतील एका कॉलेजच्या प्रिन्सिपलचे म्हणणे आहे.
की, सीबीएसई 2018-19 मधून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करू शकते कारण ते दहावीनंतर त्याच शाळेत आपले शिक्षण जारी ठेवतात.

Web Title : cbse 12th class result 2021 will cbse adopt 30 30 40 formula for 12th result read details

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update