CBSE 12th Result 2021 | ऑगस्टमध्ये होतील मुल्यांकन निकालावर असंतुष्ट विद्यार्थ्यांच्या परीक्षा, सीबीएसईचे सुप्रीम कोर्टात उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुप्रीम कोर्टात Supreme Court सोमवार 21 जून, 2021 ला बोर्ड परीक्षा आणि मूल्यांकन संबंधी याचिकांवर सुनावणी दरम्यान बोर्डाने 12 वीच्या CBSE 12th Result 2021 ऐच्छिक परीक्षा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये घेणार असल्याचे म्हटले आहे. सीबीएसई बोर्डाने म्हटले की, आम्ही पूर्व घोषित मूल्यांकन धोरणाने निकाल तयार करत आहोत. निकाल 31 जुलैपर्यंत घोषित केले जातील. मूल्यांकन आणि रिझल्टबाबत असंतुष्ट विद्यार्थ्यांना ऑगस्टच्या मध्यापासून सप्टेंबरच्या दरम्यान परीक्षांमध्ये भाग घेण्याची संधी दिली जाईल.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

यापूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने (सीबीएसई) 17 जून, 2021 ला 12 वीच्या निकालासाठी मूल्यांकन मापदंड जारी केले होते, जे सुप्रीम कोर्टाने स्वीकारले होते. बोर्डाने 12 वीच्या निकालासाठी 30:30:40 चा मूल्यांकन फॉर्म्युला दिला होता. तेव्हा सुनावणी दरम्यान कोर्टाने बोर्डाला तक्रार निवारण तंत्र, ऐच्छिक परीक्षांच्या तारखा इत्यादी गोष्टींचा समावेश करण्यास सांगितले होते. याबाबत सोमवार, 21 जूनच्या सुनावणीत सीबीएसईने सुप्रीम कोर्टात उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

Nagpur News । एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून त्यानं केली आत्महत्या, नागपुरात प्रचंड खळबळ

प्रतिज्ञापत्रानुसार, सीबीएसईने सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार 12 वीच्या मूल्यांकन मापदंडावर एक वाद निवारण समिती बनवण्यासाठी सहमती व्यक्त केली आहे.
या समितीला विद्यार्थ्यांना प्रदान केल्या जाणार्‍या गुणांवर त्यांच्या तक्रारींचे निवारण करावे लागेल.
सीबीएसईने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, 12 वीचा निकाल 31 जुलैपर्यंत जारी केला जाईल.

जर, विद्यार्थी students आपल्या परीक्षेच्या निकालावर अंसतुष्ट असेल तर त्यांना शारीरिक प्रकारे परीक्षेत भाग घेण्याची संधी दिली जाईल.
विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा Written Exam देण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी योग्य संधी दिली जाईल.
या परीक्षांचे आयोजन 15 ऑगस्ट 2021 ते 15 सप्टेंबर 2021 च्या दरम्यान ऑफलाइन प्रकारे केले जाईल.
मात्र, परीक्षेत भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेच्या आधारावर तयार निकालच अंतिम मानला जाईल.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : CBSE 12th Result 2021 cbse board says to conduct 12th optional exam in august september for unsatisfied students

हे देखील वाचा

World Music Day 2021 | वर्ल्ड म्युसिक डे ला राजीव रुईयाने केले अल्बम सोंग “मैं जावा कित्थे” चे टीजर लाँच, पहा विडिओ

MP Girish Bapat | ‘राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रातील एक छोटासा पक्ष’