CBSE बारावीचा निकाल जाहीर

हान्सिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा टॉपर 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या (सीबीएसई) १२ वीच्या सीबीएसईच्या सर्व विभागाचे निकाल लागले आहेत. १२ वीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला आहे.  या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. हान्सिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा यांनी प्रत्येकी ४९९ गुण मिळवून परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून cbseresults.nic.in आणि cbse.nic.in  निकाल पाहता येईल.

यंदा लोकसभा निवडणुकीमुळे सीबीएसईच्या बोर्डानं लवकर परीक्षा घेतल्या होत्या. यानंतर केवळ २८ दिवसांच्या कालावधीत  परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातून एकूण ३१,१४,८२१  विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या सीबीएसईची परिक्षा दिली होती. देशभरातील एकूण ४९७४ केंद्रावर ही परिक्षा पार पडली होती. यंदा मुलींचं पास होण्याचे प्रमाण ८८.७ तर मुलांचे प्रमाण ७९.४० टक्के आहे. देशभरातील सर्व विभागांची सरासरी काढल्यास बारावीचा निकाल ८३. ४ टक्के इतका लागला आहे. ८८. ७  टक्के विद्यार्थिनींनी परीक्षेत यश मिळवलं. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ७९. ५ टक्के आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

Loading...
You might also like